बॉलीवूडची bollywood प्रसिद्ध अभिनेत्री deepika padukon ही तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते. देशात सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्यांच्या संख्येत दीपिकाचा नंबर सर्वात पुढे आहे. ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या वेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्तानं चर्चेत आली आहे. इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशनच्या एसटीएक्स फिल्म्स ग्लोबल इंडियन आयकॉन दीपिका पादुकोणसोबत एक रोमांटिक कॉमेडी बनवत आहे. ज्याची निर्मिती देखील दीपिकाच्या ‘का’ प्रोडक्शन्स बॅनरनंतर्गत करण्यात येणार आहे. अशी घोषणा एसटीएक्सफिल्म्स मोशन पिक्चर ग्रुपचे चेयरमन एडम फोगेलसनद्वारे करण्यात आली आहे.
दीपिका पादुकोणभोवती केंद्रित असणाऱ्या या भारतीय क्रॉस-कल्चरल रोमँटिक कॉमेडीसाठी टेम्पल हिल प्रॉडक्शन्स विक गॉडफ्रे आणि मार्टी बोवेन, जे द ट्वायलाइट फ्रँचायझी, द फॉल्ट इन अवर स्टार्स, "लव, सायमन" यासाठी ओळखले जातात, त्यांच्याशी याबाबत चर्चा सुरु आहे. आयझॅक क्लॉसनर टेम्पल हिलच्या या प्रकल्पाची देखरेख करत आहे. याविषयी अधिक माहिती देताना फॉगेलसन म्हणाले, "दीपिका भारतातील सर्वात मोठ्या जागतिक वलयांकित कलाकारांपैकी एक आहे. ती एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेली प्रचंड प्रतिभाशाली व्यक्ती आहे. तिचा लौकिक आंतरराष्ट्रीय सुपरस्टार म्हणून वाढतोय. अनेक इरोस इंटरनॅशनल चित्रपटांमध्ये अभूतपूर्व यश तिने मिळवले असून आम्ही तिच्यासोबत आणि आमचे मित्र टेम्पल हिल यांच्यासोबत एक रोमँटिक कॉमेडी बनवण्यासाठी खूप उत्सुक आहोत.
या सहभागाविषयी दीपिका म्हणाली, जागतिक मानांकन असलेल्या कंटेंटची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि त्याची निर्मिती करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. एसटीएक्स फिल्म्स आणि टेम्पल हिल प्रॉडक्शन्ससोबतच्या भागीदारीचा मला विशेष आनंद आहे, जे ‘का’ची महत्वाकांक्षा आणि सर्जनशील दृष्टीकोन याचा विचार करणारे आहेत. दीपिका पादुकोणला 2018 मध्ये टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून गौरवलं होतं. 2018 आणि 2021 मध्ये, 'इंटरनॅशनल वुमेन्स इम्पॅक्ट रिपोर्ट' मध्ये तिच्यावर एक वेगळे फिचरही करण्यात आले होते.
द रिटर्न ऑफ झेंडर केज या चित्रपटात विन डिझेल सह-कलाकार असलेल्या चित्रपटात अभिनेत्रीने हॉलीवूड मध्ये पदार्पण केले. तिने ‘का’ प्रॉडक्शन्सअंतर्गत, छपाक आणि आगामी चित्रपट द इंटर्न आणि '83 वर काम करत असून सध्या शकुन बत्रा आणि सिद्धार्थ आनंदच्या अनटायटल्ड चित्रपटांच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. दीपिकाने अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित, समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या ‘छपाक’ चित्रपटात काम केले. तिने पद्मावतमध्ये मुख्य भूमिका साकारली ज्याने बॉक्स ऑफिस वरचे सर्व रेकॉर्ड तोडले. गेल्या वर्षी, दीपिकाला मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेण्याबाबत प्रतिष्ठित वल्ड इकोनोमिक फोरम तर्फे क्रिस्टल पुरस्कार मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.