Divya Prabha: सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा छळ, एअर इंडियातून प्रवास करताना नशेत सहप्रवाशाने...

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा चालू प्रवासात सहप्रवाशाने छळ केल्याची घटना घडलीय
actress Divya Prabha alleges harassment on air idia  flight by co passenger, files complaint
actress Divya Prabha alleges harassment on air idia flight by co passenger, files complaint SAKAL
Updated on

Divya Prabha News: सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा तिच्या सहप्रवाशाने छळ केल्याची घटना घडलीय. ही अभिनेत्री म्हणजे मल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभा. दिव्याने केरळ पोलिसांकडे याविषयी तक्रार दाखल केली आहे.

दिव्या दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची सविस्तर माहिती सांगितली आहे.

(actress Divya Prabha alleges harassment on air idia flight by co passenger)

actress Divya Prabha alleges harassment on air idia  flight by co passenger, files complaint
Shraddha Kapoor: "अरे थांब येते मी!" श्रद्धा कपूरचा पापाराझींशी मराठीत संवाद, व्हिडीओ व्हायरल

९ ऑक्टोबरला मुंबईहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट एआय ६८१ मधील एका सहप्रवाशाने तिचा छळ केला. तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर लिहिले की, तिचा सहकारी प्रवासी दारूच्या नशेत होता. विमान प्रवासादरम्यान त्याने दिव्याचा छळ झाला.

तिने सांगितले की, एअर होस्टेसला कळवल्यानंतरही, त्यांनी काहीही कारवाई केली नाही. फक्त टेक ऑफच्या आधी तिला दुसर्‍या सीटवर हलवण्यात आले.

दिव्याने इमेल द्वारे तक्रार नोंदवली त्यानुसार, 12C या सीटवर बसलेला प्रवासी नशेत होता. पुढे तो अभिनेत्रीच्या शेजारच्या सीटवर 12B बसला. नंतर त्याने उगाचच भांडण उकरायला सुरुवात केली. पुढे त्याने जागेवरुन भांडण केलं. याशिवाय त्याने अभिनेत्रीशी शाब्दिक आणि शारीरिक गैरवर्तणुक केली. पण विमान स्टाफने सहप्रवाशाबद्दल कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असं दिव्या प्रभाने तिच्या तक्रारीत म्हटलंय. (Latest Marathi News)

actress Divya Prabha alleges harassment on air idia  flight by co passenger, files complaint
Aamir Khan New Movie: पुढच्या वर्षी २०२४ चा ख्रिसमस आमिर गाजवणार, केली नव्या सिनेमाची घोषणा

"कोची विमानतळावर उतरल्यानंतर, ही समस्या विमानतळ आणि एअरलाईन अधिकाऱ्यांना कळवण्यात आली, ज्यांनी मला विमानतळावरील पोलिस मदत चौकीवर नेले. आणि मी तिकडे सहप्रवाशासंबंधी तक्रार नोंदवली", तिने लिहिले.

तिने तिची अधिकृत तक्रार पोलिसांकडे नोंदवली. यासोबत विमान प्रवासाची तिकीटं सुद्धा सोबत जोडली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने लोकांना पाठिंबा देण्याची विनंती केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com