मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केले आहे. त्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेमांगी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणते, की आता कुणाला खरा वाघ म्हणायचं. पहा नेक्स्ट पोस्ट ! या पोस्टवरुन सध्या महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) पक्षातील बंडखोरीवर भाष्य असल्याचे दिसते. हरेकृष्णा धुमाळ नावाचे यूजर्स म्हणतात, तुमचा पेशा करमणुकीचा आहे. राजकारण नाही. म्हणून तुम्ही ज्युनिअर दीपाली होऊ नका. (Actress Hemangi Kavi Promote Her Upcoming Film Tamasha Live Sharing Post On Social Media)
तुम्ही अभिनयाकडे लक्ष द्या, असे आवाहन सरदार पाटील यांनी केले आहे. वाघ समोरुन येतो... समोर यायला वाघ घाबरत नाही. वाघ घाबरुन दुसऱ्या प्राण्यांच्या म्हणजे गेंड्यांच्या वगैरे प्रदेशात पलायनही करत नाही. वाघ स्वतःची भूक भागवण्यासाठी इतरांमध्ये फोडाफोडी करत नाही. त्यामुळे सध्या जंगलातील वाघालाच वाघ म्हणायला हवे, अस खेदाने म्हणावे, अशी परिस्थिती विकास वायाळ नावाचे युजर्स म्हणाले.
हेमांगी कवीने (Hemangi Kavi) या पोस्टनंतर आपल्या आगामी चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. सदरील चित्रपट 'तमाशा Live' येत्या १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. हाच खरा हाय वाघ ! असे गाण्याचे बोल आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.