अ‍ॅव्हेंजर्स सारख्या सुपरहिरो चित्रपटांना आपल्या भारतीय वेदांतून मिळते प्रेरणा..कंगना

अ‍ॅव्हेंजर्स सुद्धा महाभारतापासून प्रेरित आहे असे मला वाटते असे एका मुलाखतीदरम्यान कंगनाने तीचे मत व्यक्त केले आहे.
Actress kangana put her opinion that superheroe movies are inspired by our vedas
Actress kangana put her opinion that superheroe movies are inspired by our vedasesakal
Updated on

अभिनेत्री कंगना राणावत ही कायम चर्चेत असणारी अभिनेत्री तीच्या विविध गोष्टींसाठी चर्चेत असते.सध्या तीच्या 'धाकड' या चित्रपटासाठी ती चर्चेत आली असून तीच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक चाललेले दिसते.(bollywood movies)तीच्या या आगामी चित्रपटात तीचा जणू प्रेक्षकांसमोर एक नवा अवतारच भेटीला आलाय.या चित्रपटात कंगनाचे ते लाल केस,तीच्या हाती बंदूक आणि तीचे आक्रमक रूप खरं तर एखाद्या हॉलीवूड स्टारप्रमाणे दिसते आहे.

कंगनाबद्दल बोलायचे झाले तर कंगना कधी सलमानच्या पार्टीमधे गेल्याबाबत ट्रोल होते तर कधी तीच्या वादग्रस्त वक्तव्यातून तीला ट्रोल व्हावे लागते.कंगनाच्या 'धाकड' चित्रपटाचे ट्रेलर आणि टिझर्स बाहेर पडताच कंगनाने तीला या चित्रपटाबद्दल फारशी शाश्वती नसल्याचे कबूल केले होते.(Dhakad Movie)हा चित्रपट कंगनाला करियरच्या कुठल्या पॉईंटवर घेऊन जाणार हे तीला ठाऊक नसल्याचे ती म्हणते.खरं तर कंगनाला जेव्हा धाकड बद्दल विचारण्यात आले होते तेव्हा ती या चित्रपटाला ९० टक्के अपात्र असल्याचे समजत होती.पण तीच्या उरलेल्या १० टक्के हिमतीच्या बळावर आणि मार्शल आर्टच्या बळावर तीने या चित्रपटाला होकार दिला होता.

एका मुलाखतीदरम्यान जेव्हा कंगनाला विचारण्यात आले होते की,"तुम्ही सुपहिरोची भूमिका करत असाल तर कॉमिक बुक स्टाईलचा अवलंब कराल की पौराणिक दृष्टीकोणाचा अवलंब कराल?" तेव्हा कंगणाचे उत्तर फार वेगळे होते.सगळे हॉलीवूडमधील कलाकार कॉमिक बुक स्टाईलने अभिनय करतात पण मात्र कंगनाचे मत यावर वेगळे आहे.प्रश्नाचे उत्तर देताना कंगना म्हणते, "मी तर पौराणिक कथांना प्राधान्य देईल.(Interview)जेव्हा मी सुपर हिरोजकडे एका आयरन मॅनच्या दृष्टीने बघते तेव्हा मला त्यांच्या अंगावरील ते आयरनी आवरन महाभारतातील कर्णाच्या चिलखतासारखे वाटते.तसेच त्यांच्या शस्त्रांची तुलना हनुमानाच्या शस्त्रांप्रमाणे वाटायला लागते.अ‍ॅव्हेंजर्स सुद्धा महाभारतापासून प्रेरित आहे असे मला वाटते."

"या चित्रपटांचा व्हिज्युअल दृष्टीकोन जरी वेगळा असला तरी या सुपरहिरो कथांचा उगम आपल्या पौराणिक वेदांतून प्रचंड प्रेरीत झालाय असे मला वाटते.(movies)ते सुद्धा हे वास्तव मान्य करतात असेही ती म्हणाली.त्यामुळे मी पाश्चिमात्य कॉमिक कथांना फॉलो करण्यापेक्षा मी माझ्या मूळ संस्कृतीतून काही तरी नविन करण्याचा प्रयत्न करील",असे ती उत्तर देताना म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.