Madhuri Dixit Panchak: "चित्रीकरणादरम्यान थोड्या अडचणी आल्या", माधुरी दीक्षितने सांगितला 'पंचक'चा अनुभव

पंचक सिनेमाबद्दल माधुरी दीक्षितने खास गोष्ट सर्वांसमोर आणलंय
actress madhuri dixit share panchak trailer 2 on social media
actress madhuri dixit share panchak trailer 2 on social media SAKAL
Updated on

Panchak Trailer 2 News: डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित 'पंचक' हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस असतानाच आता या चित्रपटाचा आणखी एक उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. इतकेच नाही तर बॉलिवूडमधील काही नामवंत कलाकारांनी 'पंचक'च्या ट्रेलरचे भरभरून कौतुक केले आहे. नवीन वर्षात प्रदर्शित होणारा हा चित्रपट मल्टीस्टारर आहे. अशातच चित्रपटाचा नवीन ट्रेलर भेटीला आलाय.

actress madhuri dixit share panchak trailer 2 on social media
31st पार्टीसाठी दीपिकाने चाहत्यांना दिल्या भन्नाट आयडिया

'पंचक'च्या पहिल्या ट्रेलरने खूप उत्सुकता निर्माण केली होती. त्यात आता या दुसऱ्या ट्रेलरने अधिक भर टाकली आहे. खोतांच्या घराला पंचक लागल्याने 'आता कोणाचा नंबर ?' हा प्रश्न अवघ्या घराला पडलेला असतानाच, अनेक जण आपापल्या परीने हे संकट टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.

या सगळ्या गोंधळात घरात सर्कस होत आहे, ऑपेराही होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे, याचे उत्तर प्रेक्षकांना ५ जानेवारी रोजी मिळणार आहे. कथा, दिग्दर्शन, कलाकार, संगीत या सगळ्याच चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.

चित्रपटाबद्दल माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ''या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह बाबींमध्ये मी विशेष लक्ष घातले आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रत्येकाची निवड ही योग्य आहे. चित्रपट पाहताना याचा प्रत्यय प्रेक्षकांनाही नक्कीच येईल.

प्रत्येक कलाकार त्या व्यक्तिरेखेत चपखल बसला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान थोड्या अडचणी आल्या परंतु आज जेव्हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, तेव्हा मनाला समाधान मिळतेय. मला खात्री आहे, चित्रपटावर प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रेम करतील.''

जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या पंचक चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

तर आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे. पंचक ५ जानेवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.