Megha Ghadge on Pushkar Jog: "जात बघून मैत्री करणारा तू...", मेघा घाडगेंचा पुष्करवर संताप

मेघा घाडगेंनी पुष्कर जोगवर संताप व्यक्त केलाय
actress megha ghadge angry post on pushkar jog bmc workers statement
actress megha ghadge angry post on pushkar jog bmc workers statement SAKAL
Updated on

Megha Ghadge on Pushkar Jog News: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. पुष्कर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

पुष्करने बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल एक विधान केलं होतं. त्यामुळे त्याला टीका सहन करावी लागली. आता अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मेघा घाडगेंनी पुष्करचा चांगलाच समाचार घेतलाय.

actress megha ghadge angry post on pushkar jog bmc workers statement
Veer Savarkar: "एकाची इतिहासाने दखल घेतली तर दुसऱ्याला...", गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त 'वीर सावरकर'ची रिलीज डेट जाहीर

काय म्हणाल्या मेघा घाडगे?

मेघा घाडगेंनी पुष्करचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतलाय. मेघा लिहीतात, #BMC #महिलासन्मान जोग बोलणार आणि आम्ही गप्प बसणार??? बाई माणुस नसत्या तर नक्कीच दोन लाथा मारल्या असत्या??? तुला २ लाथा आणि कानाखाली मारावी अशी इच्छा झाली पण तुझी भाषा आणि विचारसरणी पाहता वाईट वाटलं. कारण जात बघुन मैत्री करणारा तु. विचारांनमध्येच घाण. काय करणार?

मेघा पुढे लिहीतात, "अरे मित्रा.... त्या साठी शासनाच्या सर्वेचा अभ्यास करावा. आजूबाजूला थोडी चौकशी करावी..! माहितीचा फॉर्म हवा असल्यास माझ्याकडे आहे. तो मी नक्कीच तुला पाठवेन. ते ही नको हव असेल तर तुझ्याच जातीची काही माझे मित्र मैत्रिणी आहेत जे तुझ्या विचारसरणीचे नाहीत त्यांना तरी नक्की विचार. चित्रपटासाठीचा जर का हा केविलवाणा प्रयत्न असेल तर.. वा घाण ...वा घाण ... वा घाण..!"

actress megha ghadge angry post on pushkar jog bmc workers statement
Ashok Saraf: अशोक मामांना पहिला सिनेमा कसा मिळाला ? जाणून घ्या किस्सा

पुष्करचा जाहीर माफीनामा

पुष्करने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करुन लिहीलंय की, "मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी.."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.