मुंबई- अभिनेत्री नाया रिवेरा ही काही दिवसांपूर्वी कॅलिफोर्निया येथील पीरु तलावात पोहण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत तिचा ४ वर्षांचा मुलगा देखील होता. मात्र परत येताना बोटीवर तिचा मुलगा एकटाच परतला तेव्हा नाया बेपत्ता झाल्याचं कळतंय. गेले काही दिवस नायाचा शोध सुरु होता अखेर मंगळवारी तिचा मृतदेह शोधण्यात शोधपथकाला यश आलं. अभिनेत्री नाया रिवेराचा मृतदेह ती बेपत्ता झाल्यानंतर पाच दिवसांनी सापडला आहे. आता नायाचा शवविच्छेदन रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये तिच्या मृत्युचं कारण स्पष्ट झालं आहे.
वेंचुरा काऊंटी मेडिकल एक्जामिनरच्या कार्यालयाने स्पष्ट केलं आहे की नाया रिवेराचा मृत्य बुडल्यामुळे झाला आहे. अभिनेत्री नायाचा मृतदेह १३ जुलै रोजी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पीरु तलावात तंरगताना सापडला. कार्यालयाने १४ जुलै रोजी जाहीर केलेल्या माहितीमध्ये म्हटलंय की तिचा मृत्यु पाण्यात बूडल्यामुळे झाला आहे. तिच्या शवविच्छेदन अहवालात कोणत्याही प्रकारचा मार लागल्याचं दिसून आलेलं नाही तसंच तिच्या शरिरात देखील कोणताही अल्कोहोल पदार्थ किंवा ड्रग्स दिसून आलेले नाहीत. या शवविच्छेदन अहवालातून हे स्पष्ट होतंय की तिचा मृत्यु हा पाण्यात बुडल्यामुळे झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'नायाच्या मुलाने सांगितलं होतं की पहिले आईने बोटीत चढण्यासाठी माझी मदत केली मात्र जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा आई पाण्यात हरवली होती.' यापुढे जाऊन पोलिसांनी माहिती दिलीये की, नाया रिवेरा तिच्या ४ वर्षाच्या मुलासोबत सरोवरामध्ये पोहण्यासाठी एक भाड्याची बोट घेऊन निघाली होती. खूप वेळाने जेव्हा बोट परत आली नाही तेव्हा पोलिसांना कळवण्यात आलं.
ज्या सरोवराच्या किना-यावर तिचा मृतदेह सापडला तिथेच तिचा ४ वर्षांचा मुलगा जोसी एकटा बोटीवर सापडला होता. रिवेराला २००५ मध्ये फॉक्स वाहिनीवर येणा-या 'ग्ली' शोमध्ये एक लेस्बियन तरुणी सैंटेना लोपेजच्या भूमिकेने प्रसिद्धी मिळाली होती. हा शो २००९ पासून के २०१५ पर्यंत सुरु होता.
actress naya rivera cause of death revealed in autopsy report
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.