Priya Bapat: नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच लघुशंका आली.. प्रिया बापटचा भन्नाट किस्सा

झी मराठी वरील 'बस बाई बस' कार्यक्रमात प्रियाने सांगितला भन्नाट किस्सा..
actress priya bapat participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave
actress priya bapat participate in bus bai bus show on zee marathi host by subodh bhave sakal
Updated on

subodh bhave: गेली काही दिवस सुबोध भावेच्या 'बस बाई बस' या कार्यक्रमाची भलतीच चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस' या नव्या मालिकेत महिला कलाकार, राजकारणी सहभागी होतात यावेळी त्यांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुबोध भावे (subodh bhave) करत आहे. या कार्यक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. मराठीसह हिंदीलाही भुरळ घालणारी अभिनेत्री प्रिया बापट हिने नुकतीच या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या नाटकाचा एक भन्नाट किस्सा सांगितला. हा किस्सा ऐकून तुम्हीही हसून वेडे व्हाल..

मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरिज अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांना भुरळ घालणारी प्रिया नुकतीच बस बाई बस या शो मध्ये आली होती. यावेळी एका मजेशीर प्रश्नावर प्रियाने दिलेले उत्तर ऐकून एकाच हशा पिकला. प्रियाने बरीच वर्षे व्यावसायिक नाटकात काम केले आहे. त्याच नाटका दरम्यानचा हा किस्सा आहे. यावेळी सुबोध भावेने प्रियाला विचारले, 'कलाकार कधी वाक्य विसरतात, कधी जास्तीची वाक्य घेतात, यामुळे बऱ्याचदा नाटक लांबतं. अडीच तासाचं नाटक कधीकधी तीन तासाचं होतं. पण याव्यतिरिक्तही काही कारणांमुळेही नाटक लांबलेलं मी ऐकलं आहे. नेमंक काय घडलं होतं?'

त्यावर प्रिया म्हणाली, 'उमेश कामत, मी आणि हेमंत ढोमे ’नवा गडी नवं राज्य’ हे नाटक करायचो. पुण्यातील एका प्रयोगाला एक किस्सा घडला. नाटकात एका सीनमध्ये मी रंगमंचावरून बाहेर गेल्यावर हेमंत-उमेशचं संभाषण सुरू होतं आणि त्यांच्या काही वाक्यानंतर माझी पुन्हा एन्ट्री होते. प्रयोग सुरू असताना नाटकातील त्या सीनला मी विंगेत गेले आणि माझ्या लक्षात आलं की मला लघुशंका आली आहे. पुढे मला संपूर्ण नाटक करायचं होतं. त्यामुळे मी विंगेतून हेंमत आणि उमेशला खुणावून सांगितलं की तुम्ही संभाषण चालू ठेवा. मी पटकन जाऊन येते.'

पुढे ती म्हणाली, 'हेंमत आणि उमेशने मी येईपर्यंत संभाषण सुरू ठेवलं. मी पटकन धावत गेले आणि आल्यानंतर त्यांना विंगेतून खुणावलं. मी आले आहे. आता तुम्ही शेवटचं वाक्य घ्या. म्हणजे मला पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेता येईल,' प्रियाने हा किस्सा सांगताच सुबोधही हसू लागला. तो पुढे म्हणाला, 'बरेचसे कलाकार असे असतात जे नाटकाची तिसरी घंटा व्हायच्या आधी बाथरूमजवळ सापडतात. नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांना प्रेशर आलेलं असतं. पण यावरूनच कलाकारांची त्यांच्या कामावर, नाटकावर असलेली श्रद्धा दिसून येते.' सध्या प्रियाचा हा किस्सा चांगलाच गाजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.