Gautami Patil: जोपर्यंत हे चवीने बघतायत तोपर्यंत.. आता प्रिया बेर्डेनं घेतला गौतमी पाटीलचा समाचार..

लावणी डान्सर गौतमी पाटीलच्या नृत्यावर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची टीका..
actress priya berde angry reaction on gautami patil lavani show
actress priya berde angry reaction on gautami patil lavani showsakal
Updated on

priya berde on gautami patil lavani: गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. ग्रामीण भागात तर गौतमी पाटील हे नाव काढल्या शिवाय लोकांचे कार्यक्रम होत नाहीत. एकेकाळी टीकेची शिकार झालेल्या गौतमीच्या डान्सशो साठी सध्या वेटिंग आहे.

आज असे चित्र असले तरी मध्यंतरी गौतमी नृत्य करताना अश्लील हावभाव करते म्हणून तिच्यावर टिका करण्यात आली होती. राज्यभरात बरीच आंदोलनं झाली. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केलं होतं.

पण अजूनही तिचा तसाच नाच सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावरून दोन दिवसांपूर्वीच तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर टीका केली होती. लावणीची गौतमी करु नका.. असे टे परखडपणे बोलले होते.. अशातच तर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही गौतमीवर निशाणा साधला आहे.

(actress priya berde angry reaction on gautami patil lavani show)

actress priya berde angry reaction on gautami patil lavani show
Swara Bhasker: द्रौपदीचं वस्त्रहरण ते पाकिस्तान प्रेम.. स्वराच्या 'या' विधानांनी उडवली होती खळबळ..

गौतमी पाटील बाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या, ';या सर्व गोष्टीला बघणारे जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जो पर्यंत आहेत तोवर असे शो बंद होणार नाहीत, बघणाऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्या शिवाय या गोष्टी बंद होणार नाहीत. आम्ही आणि राज्यकर्ते यांनी कितीही ओरडून आणि निषेध करून काही होणार नाही.''

पुढे त्या म्हणाल्या, ''लोक मोठाळ्या पैशांच्या सुपाऱ्या देऊन त्यांना आणतात. आम्ही काही बोललो की आम्हाला ट्रोल केलं जातं. पण म्हणून आम्ही बोलणं थांबवणार नाही. पण लोकं जोपर्यंत असे कार्यक्रम पाहणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे सुरुच राहणार” अशी भूमिका प्रिया बेर्डे यांनी मांडली आहे.

'सांगली' मध्ये एका कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना गौतमी पाटील यांच्या विषयी विचारलं असता त्यांनी हे मत मांडलं. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला आहे. नाशिक येथे भाजप नेते चंद्रकांत बावणकुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.