Priyadarshini Indalkar: "मी सावित्रीबाईंची चिरी लावून गेले आणि..", प्रियदर्शनीची पोस्ट चर्चेत

प्रियदर्शनी इंदलकरची पोस्ट चर्चेत आहे
Priyadarshini Indalkar
Priyadarshini IndalkarSAKAL
Updated on

Priyadarshini Indalkar News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनीने आजवर अनेक सिनेमे, वेबसिरीज मधून तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

प्रियदर्शनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. प्रियदर्शनीला  “सावित्रीची लेक २०२४”  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. प्रियदर्शनीने या पुरस्कार सोहळ्यात सावित्रीबाईंची चिरी लावली होती. त्यामुळे तिचं कौतुक होतंय. काय म्हणाली प्रियदर्शनी बघा...

Priyadarshini Indalkar
Satyashodhak Review: 'ज्योती - सावित्री'चा जीवनप्रवास दाखवणारा 'सत्यशोधक' कसा आहे? वाचा हा रिव्ह्यू

प्रियदर्शनीने केली अनोखी गोष्ट


प्रियदर्शनीने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलंय की, "३ जानेवारीला, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त, ज्ञान Foundation कडून मला “सावित्रीची लेक २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सोनाली कुलकर्णीच्या पोस्ट वरुन प्रेरणा घेऊन, हा पुरस्कार स्विकारताना, मी सावित्रीबाईंची चिरी लावून गेले, आणि ताईने लिहीलेल्या ओळी देखील मनोगतात व्यक्त केल्या. स्वतःला “सावित्रीची लेक“ म्हणवुन घेताना ही चिरी माझ्यातल्या स्वाभिमानाला आणखीन प्रोत्साहन देत होती. श्रीपाल सबनीस, मनोहर कोलते यांचे मनापासून आभार! हास्यजत्रेमुळे मी घराघरात पोहोचते आहे, आणि हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे असे पुरस्कार माझ्या पदरी पडत आहेत."

असं लिहीत तिने शेवटी सचिन मोटे, सचिन गोस्वामी, अमित फाळकेंचे आभार मानले आहेत.

प्रियदर्शनीचा आगामी सिनेमा

प्रियदर्शनी आगामी  ‘नवरदेव BSc. Agri.’  या सिनेमातून भेटीला येणार आहे. शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे.

क्षितीश दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल.

आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.