राणा-अंकिता येणार एकत्र; नवी जोडी नवा 'डाव'

मालिकेतील राणा दा आणि अंजली या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
राणा-अंकिता येणार एकत्र; नवी जोडी नवा 'डाव'
Updated on

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'तुझ्यात जीव रंगला'मधील 'राणा'ची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीला (hardeek joshi) त्याच्या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील राणा आणि अंजली या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. राणा आता लवकरच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अंकिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधा सागारसोबत (radha sagar) 'डाव' (Daav) या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हार्दिक आणि राधा यांच्या जोडीला पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. (actress radha sagar and actor hardeek joshi working together in marathi movie Daav)

डाव या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला.या चित्रपटामध्ये हार्दिक आणि राधा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. राधाने सोशल मीडियावर चित्रपटाच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमाचा फोटो फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राधा आणि हार्दिक दिसत आहेत. राधाने या फोटोला कॅप्शन दिले, 'नवं काही तरी येत आहे. 'डाव'..' या फोटोमध्ये दोघांनी या चित्रपटाचा क्लॅप बोर्ड हातात धरला आहे.

राणा-अंकिता येणार एकत्र; नवी जोडी नवा 'डाव'
सेलिब्रिटींची पोस्ट फुकटची नसते; इन्स्टा कमाई ऐकून थक्क व्हाल

राधाने आई कुठे काय करते या मालिकेमध्ये खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिच्या या मालिकेमधील अभिनेयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आत्ता पर्यंत हार्दिक आणि राधाने छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता या दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

राणा-अंकिता येणार एकत्र; नवी जोडी नवा 'डाव'
घटस्फोटानंतर आमिर-किरणची पहिली मुलाखत; म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()