Radhika Deshpande: चार कागद, दोन सह्या, एक शिक्का.. मुख्यमंत्र्यांना टॅग करत मराठी अभिनेत्रीची खरमरीत पोस्ट

अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण… अभिनेत्रीची संतप्त पोस्ट..
actress radhika deshpande angry post on government work ignorance and tag cm eknath shinde
actress radhika deshpande angry post on government work ignorance and tag cm eknath shindesakal
Updated on

Radhika Deshpande: मराठी मनोरंजन विश्वात नाटक, मालिका, सिनेमा ह्यामध्ये विविध प्रयोग करणारी सर्जनशील अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. राधिकाचे मनोरंजन क्षेत्रातील काम खूप वेगळे आणि मोठे आहे. पण तिची लोकप्रिय ओळख म्हणजे देविका..

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिका अरुंधतीच्या खास मैत्रीणीची म्हणजे 'देविका'ची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे.

राधिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती आपले अनुभव, फोटो शेयर करत असते. पण आज राधिकाणे एक पोस्ट शेयर करत शासकीय कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.

(actress radhika deshpande angry post on government work ignorance and tag cm eknath shinde)

actress radhika deshpande angry post on government work ignorance and tag cm eknath shinde
Surekha Sikri: नजरेत धाक आणि आवाजात जरब.. 'त्या'वेळी सुरेखा सिक्री यांनी सरकारलाही धरलं होतं धारेवर..

राधिका देशपांडे उन्हाळ्याच्या सुट्टीत बालनाट्य शिबिर घेत असते. सध्या याच शिबिरासाठी ती जागेच्या शोधत आहे. यानिमित्ताने शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. पण कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच संदर्भात तिने एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग देखील केले आहे.

या पोस्ट मध्ये राधिका म्हणते, ''चार कागद, दोन सह्या, एक शिक्का.. ताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्स मधून खेचून बाहेर काढले आहेत, खास व्हायरल मटेरियल आहेत त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोन मधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या.''


"देश बदल रहा है, तरक्की हो रही है", ती खास करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी.''


''विषय साधा होता. मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी "चल हट" म्हणून बाजूला करण्या जोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते.''


हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

''२४ मार्च ला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून मूठभर मास चढलेल्या माणसांवर काय परिणाम होणार? सध्या वरून कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही, त्यासाठी खुर्चीचा आवाज होईल इतकी तरी हालचाल करावी लागते. असो.''


''आज १८ एप्रिल. शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा असे वाटले होते. पण ना आपणहून कागद हलले, ना कधी मिळेल हे कळले, ना भाडं किती बसेल हे सांगण्यात आले. काहीच घडले नाही. नाकावरची माशी हलली नाही का भुवया उंचावल्या नाहीत. कोण घेईल तेवढे कष्ट! मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरी एवढी. खूप पाहिलेत, खूप भेटलेत, पण ह्यांना माफी नाही. कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन केलंच पाहिजे.''


''मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.''

''मुद्दाम नाव घेऊन लिहिते आहे. ही माझी बाजू आहे. गोष्टीची दुसरी बाजू असू शकते.
चार कागद, दोन सह्या, एक शिक्का, असे तुमचेही अनुभव आहेत का? ढिगाऱ्यात कागद, सह्या, शिक्के, आशा, अपेक्षा, आकांक्षा खितपत, कुजत, खुंटीवर लटकलेले सापडतील. त्यांचीच रचलेली होळी तुम्ही पहायची, पेटणार नाही कारण पेट घ्यायला काटक्या, रॉकेल, काडीपेटी ते आणताहेत, पण वेळ लागेल. सोपं वाटलं काय! एक करा. सगळ्यावर पाणी फेरा, नाहीतर तोंड उघडा, शाब्दिक का असेना एक बुक्का नक्की हाणा.'' अशा शब्दात तिने शासनाच्या कामकाजाची पोलखोल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()