Radhika Deshpande: भिडे गुरुजींना भेटून भारावली अभिनेत्री.. म्हणाली, आंब्या सारखी गोड आणि..

भिडे गुरुजींसाठी अभिनेत्रीने केली खास पोस्ट..
Actress Radhika Deshpande shared post for sambhaji bhide guruji
Actress Radhika Deshpande shared post for sambhaji bhide gurujisakal
Updated on

Radhika Deshpande: मराठी मनोरंजन विश्वात नाटक, मालिका, सिनेमा ह्यामध्ये विविध प्रयोग करणारी सर्जनशील अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. राधिकाचे मनोरंजन क्षेत्रातील काम खूप वेगळे आणि मोठे आहे. पण तिची लोकप्रिय ओळख म्हणजे देविका..

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत राधिका अरुंधतीच्या खास मैत्रीणीची म्हणजे 'देविका'ची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय आहे.

राधिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेकदा ती आपले अनुभव, फोटो शेयर करत असते. मध्यंतरी तिने एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेली पोस्ट चांगलीच गाजली. आता तिने संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर एक पोस्ट लिहिली आहे.

(Actress Radhika Deshpande shared a post for sambhaji bhide guruji)

Actress Radhika Deshpande shared post for sambhaji bhide guruji
Prajakta Gaikwad: प्राजक्ता गायकवाडने अमोल कोल्हेंचं 'शिवपुत्र संभाजी' नाटक सोडलं, कारण आलं समोर..

अभिनेत्री राधिका देशपांडे हिने काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे यांच्या सोबत सांगली येथे जाऊन संभाजी भिडे म्हणजेच भिडे गुरुजी यांची भेट घेतली. आता या भेटीचे फोटो राधिकाने शेयर केले आहेत. सोबतच एक पोस्ट देखील तिने लिहिली आहे.

त्यात राधिकाने म्हंटले आहे की, ''"छडी लागे छम छम"च्या काळातली माणसं "वयम् मोठम् खोटम्" वाटायला लावणारी आहेत. इंदिरा आजी १०३ तर भिडे गुरुजी ९० सांगली मिरजकडे राहणारी ही पिकलेल्या आंब्या सारखी गोड आणि चिरोट्यांच्या पापुद्र्यांसारखी त्यांची कांती, साजूक तुपाचे पावित्र्य आणि वागण्या बोलण्यातला ओलावा?.. तेवत असलेल्या समयीच्या वातीतला. ''

''वटवृक्षाच्या झाडासारखी मातीत घप्प मुळांचे गोफ गुंफित तटस्थ उभी. त्यांना पारंब्या तरी किती! त्यांच्या सावलीत काही क्षण वेचता आले, पारंब्यांवर झुलता आले.''

Actress Radhika Deshpande shared post for sambhaji bhide guruji
Singer KK Death Anniversary: 'केके'ची आज पहिली पुण्यतिथी आणि त्याचं शेवटचं मराठी गाणं रिलीज झालंय..

पुढे राधिका म्हणाली, ''आजी होती मऊ मऊ. तर गुरुजींच्या नजरेतून एकही गोष्ट सुटली नाही. विलक्षण! मोठेपण यायला बालपण जपून ठेवावे लागते. करं जोडोनी मागते मी तुजला.. "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा"..'' अशी पोस्ट तिनं लिहिली आहे.

मध्यंतरी नाटकांच्या तालमींसाठी जागा मिळत नाही म्हणून ती प्रशासना वर चांगलीच भडकली होती. त्यानंतर तिच्या सर्व अडचणी दुसर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केल्याने तिने सर्वांचे जाहीर आभार देखील मानले होते. एवढेच नाही तर सध्याच्या सरकार विषयी तिने भरभरून लिहिलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()