Rakhi Sawant Arrested: राखी नरमली, तुरुंगात जायला घाबरली, जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव

मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अपील केलं आहे
Rakhi Sawant Arrested News
Rakhi Sawant Arrested NewsSAKAL
Updated on

Rakhi Sawant Arrested: राखी सावंतला मुंबई हायकोर्टातुन अटकेसाठी तूर्तास दिलासा मिळाला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले होते.

पुढे राखीने अटक होण्यापासून सुटका व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अपील केलं आहे. राखीला तुर्तास हायकोर्टाकडून दिलासा मिळाला असून मंगळवारपर्यंत राखीला कोणतीही अटक होणार नाही, असा आदेश हायकोर्टाने दिलाय

Rakhi Sawant Arrested News
Rakhi Adil Video Viral : 'हा घ्या आमच्या हनीमुनचा व्हिडिओ! राखीच्या नवऱ्यानं दिला पुरावा, आता तरी...

राखी सावंतला मॉडेलचा शर्लिन चोप्राचे फोटो व्हायरल केल्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी अटक केली होती. काही तास चौकशी करून मुंबई पोलिसांनी राखीची सुटका केली. परंतु हीच गोष्ट पुन्हा घडू नये म्हणून राखीने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला.

पुढे मुंबई हायकोर्टाने राखीचा जामीन नाकारणं हे बेकायदेशीर आहे असा निर्णय देत मुंबई पोलिसांना फटकारले. त्यामुळे आज मंगळावरपर्यंत राखीला अटक होणार नाही, असा आदेश देऊन सध्या तरी अटकेपासून राखीला तूर्तास दिलासा मिळालाय.

Rakhi Sawant Arrested News
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस आणि रियाज अलीच्या व्हिडिओवरुन भडकलाय वाद.. कारण..

शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंतविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तिने पत्रकार परिषदेदरम्यान चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, असा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

गेल्या वर्षी राखीने पोलिसांना सांगितले की, शर्लिन चोप्राने 6 नोव्हेंबर 2022 रोजी यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तिने तिच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि असभ्य भाषा वापरली होती.

दरम्यान राखीने तिच्या फोनमधून शर्लिन चोप्राचे आक्षेपार्ह्य व्हिडिओ डिलीट केलेत, असा दावा राखीच्या वकिलांनी केलाय. आता राखीला अटक होणार कि मुंबई हायकोर्ट राखीचा जामीन निश्चित करणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.