Pathaan Controversy: 'म्हणून हे विष पेरायचं काम करतायत...', भगव्या बिकिनी वादात रत्ना पाठक यांची उडी

रत्ना पाठक सध्या त्यांच्या 'कच्छ एक्सप्रेस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमावरनं होणारे वाद रत्ना पाठक यांना नवे नाहीत.
Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy
Actress Ratna Pathak Shah on Pathaan ControversyGoogle
Updated on

Pathaan Controversy: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या आपला गुजराती सिनेमा 'कच्छ एक्सप्रेस'मुळे चर्चेत आहेत. या सिनेमात 'तारे जमीं पर' फेम अभिनेता दर्शिल सफारी देखील मुख्य भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त मानसी पारेख देखील या सिनेमात आहेत. रत्ना पाठक शाहने आपल्या या सिनेमाविषयी बातचीत करताना बॉलीवूडच्या गोल्डन एरामधील सिनेमांच्या वादावर देखील स्पष्ट भाष्य केलं आहे.(Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy)

Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy
KRK: 'एक नेता, एक अभिनेता आणि एक पोलिस अधिकारी मिळून..', सुशांतचे नाव घेत केआरके चे खळबळजनक ट्वीट

रत्ना पाठक यांनी आजपर्यंत साकारलेल्या जवळपास सर्वच भूमिका नेहमी महिला सक्षमीकरणावर भाष्य करताना दिसल्या आहेत. रत्ना पाठक म्हणाल्या,''मी अशा स्क्रिप्ट निवडते ज्यात मला स्वतःला पहायला आवडेल. मला सामाजिक भान जपायला आवडतं. कारण मला माहितीय त्याच्याशिवाय कलेचं महत्त्व नसतं. इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत,ज्यातनं मनोरंजन होतं पण सामाजिक मूल्य कलेच्या माध्यमातून जपता आली पाहिजेत. मला आधी जे केलंय तेच तेच पून्हा करण्यात फार रस नसतो. आधी झालं ते सगळं ग्रेट होतं आणि त्याच धर्तीवर जे सिनेमे बनतात अशा सिनेमात सतत काम करणं मला आवडत नाही. मग मला उपाशी रहायची वेळ आली तरी चालेल,मी ते सिनेमे नाही करणार''.

Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy
John Abraham: एकेकाळी जॉनला वाऱ्यालासुद्धा उभं करायचा नाही शाहरुख,'काल' सिनेमाचा निर्माता असताना तर...

रत्ना पाठक पुढे म्हणाल्या,''मला वाटतं आपण आज जिथे आहोत त्याच्या पुढचा विचार करायला हवा. जे आधी झालं,त्याच्या आधारानं आपण काम करत आहोत यात माझं दुमत नाही. पण हे जे लोक बोलतायत गोल्डन एरा...सिनेमांचा सुवर्णकाळ हे जरा अतीच होतंय. किती दिवस ते कुरवाळत बसणार आपण. माझी मावशी तर बोलायची भारताचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे. त्यामुळे मी देखील हेच योग्य आहे असं मानते. आधी जे होऊन गेलं त्याला आपण सुवर्णकाळ म्हणूच शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना बंधनात बांधून ठेवलं जातं तो सुवर्णकाळ कसा असू शकतो. त्यामुळे मी तरी त्या सुवर्णकाळाची वाट पाहतेय''.रत्ना पाठक यांनी सिनेमांवरनं होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या वादांवर भाष्य केलं.

Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy
Deepika Padukone: 'बिकिनी भगवी नाही चिश्ती रंगाची..', आता मुस्लिम संघटना पेटल्या...

पठाण वादावर बोलताना त्या म्हणाल्या, ''माझा एका सिनेमा आला होता,'लिपस्टिक माय बुर्का', तेव्हा तर खूप तमाशा झाला होता. स्त्री केंद्रित सिनेमा होता म्हणून त्यावर बंदी आणण्याचा सूर उमटला होता. मला तेव्हा काहीच कळत नव्हतं..पण या सगळ्या गोष्टी होत राहतात,समाजाची विचारधारणा बदलायला खूप वेळ लागतो..आणि यात खूप गोष्टी न समजतील अशा घडत असतात. समुद्र मंथनाची कथा आपण सगळ्यांनी ऐकली असेल,त्यातनं अमृत बाहेर येतं तसं विष देखील बाहेर फेकलं जातं. कोणी तरी शिवा हवाच त्याला प्राशन करण्यासाठी. आपल्याकडे आज शिवा नाही,यामुळे हे लोक विष थुंकतायत इकडे-तिकडे. पण एक दिवस तो शिवा देखील येईल आणि त्याच्या सोबतीनं आपण सगळे शिवा बनू..आणि या विषाला पचवून आपण पुढे जाऊ''.

पुढे रत्ना पाठक म्हणाल्या,''जर सिनेमांची समिक्षा करत त्यात काय कमी आहे यावर चर्चा होत असेल तर ती झालीच पाहिजे. आपल्याकडे कुणी समिक्षक नाहीय. अर्ध्याहून अधिक मीडिया तर समिक्षा करतच नाही. सिनेमाचं तरी ठीक पण नाटकाची समिक्षा होताना दिसतच नाही. आपण क्रिटिसिझमला घाबरतो. भारतात ही एक अडचण आहे. या अशा वातावरणात निर्मिती करणं कठीण होऊन बसलं आहे.निर्मात्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्टीत कायदा आणावा लागतो. कारण कधी कोण नाराज होईल हे सांगता यायचं नाही. ही ती जागा नाही राहिली जिथे कलेची निर्मिती केली जाईल. सिनेमे बनतील. पैसा पण येईल पण चांगलं काम करणं कठीण होऊन बसेल...शेवटी कधी कुठून कोणाचा विरोध येईल याचं दडपण कायम राहिल''.

Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy
'Campervan' मध्ये राहणारा बॉलीवूडचा पहिला अभिनेता बनला हर्षवर्धन राणे..थेट हॉलीवूडच्या पंक्तीत जाऊन बसला

रत्ना पाठक यांचा 'कच्छ एक्सप्रेस' सिनेमा ६ जानेवारीला रिलीज होत आहे. या सिनेमा संदर्भात त्यांच्या गुजराती चाहत्यांमध्ये भलताच उत्साह पहायला मिळत आहे. सासू-सूनेच्या या सुंदर कथेतून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()