कारगिल युद्धाशी अभिनेत्री रविना टंडनचं मोठं कनेक्शन होतं;वाचा सविस्तर

अनेक वर्षांनी अभिनेत्रीनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Raveena Tandon
Raveena TandonGoogle
Updated on

90 च्या दशकातील हिट अॅन्ड हॉट अभिनेत्री म्हणजे रविना टंडन(Raveena Tandon). बॉलीवूडमधील अभिनेत्यांपासून सर्वसामान्य मुलांपर्यंत सारेच रविनाचे चाहते होते. अक्षय कुमार आणि तिचं अफेअर तर तेव्हा चांगलच गाजलं होतं. त्या प्रेमप्रकरणातून बाहेर पडणं तिला खूप कठीण गेलं होतं असं तिनेच अनेकदा सांगितलं आहे. सध्या ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा अभिनयाचा आनंद घेताना दिसत आहे. नुकतीच तिची 'अरण्यक' ही वेबसिरीज भेटीला आली आहे. या सिरीजच्या माध्यमातूनच तिनं डिजिटल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आपण सुरवात केली होती तिच्या चाहत्यांविषयी बोलायला. तर तिच्या चाहत्यांमध्ये एक मोठ नाव होतं. ते ही पाकिस्तानशी जोडलेलं. तिच्या चाहत्यांमध्ये सामिल होते तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ.

IAF personnel loading a bomb with ‘From Raveena Tandon to Nawaz Sharif’ message written on it
IAF personnel loading a bomb with ‘From Raveena Tandon to Nawaz Sharif’ message written on it Google

रवीना ही नवाझ शरीफ यांची अतिशय आवडती बॉलिवूड अभिनेत्री होती. त्यामुळे कारगिल युद्धाच्या वेळी काही सैनिकांनी अभिनेत्रीचे नाव लिहिलेला एक बॉम्ब त्यांना गिफ्ट म्हणून दिला होता. बऱ्याचदा सोशल मीडियावर या बॉम्बचा फोटो व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये हिरव्या रंगाच्या बॉम्बवर ‘रवीना टंडनकडून नवाझ शरीफ यांना’ असे लिहिण्यात आल्याचे दिसते. त्यासोबतच हार्ट काढण्यात आले होते.

Raveena Tandon
'भारताचा झेंडा दाढीवर,हे तुम्ही ठीक नाही केलं' अमिताभ बच्चन झाले ट्रोल

साधारण ३ मे १९९९ रोजी सुरू झालेलं कारगिल युद्ध जवळपास जुलै महिन्यापर्यंत चालू होतं. अनेक शूर वीरांना यामध्ये प्राणाची आहुती द्यावी लागली. पण त्यांचं ते बलिदान व्यर्थ गेलं नाही. आपल्या शूर सैनिकांनी कारगिल युद्ध अखेर जिंकलं. पण कारगिल युद्धाच्या वेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनसोबत एक किस्सा घडला होता. रवीनाचे नाव लिहिलेला एक बॉम्ब पाकिस्तानचे त्यावेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पाठवण्यात आला होता. यावर आता रवीनाने प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर लाइव्ह चॅट दरम्यान रवीनाला एका युजरने या घटनेबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर रवीनाने उत्तर देत याबाबत तिला फार उशिरा माहिती मिळाली होती असे सांगितले. ‘एखाद्या आईला तिच्या मुलांना गमावल्यानंतर आनंद होत नाही. तसंच बॉर्डरच्या दोन्ही बाजूला देशातील लोकांचे रक्त वाहत होते,त्यामुळे तेव्हा यावर काही बोलणं उचितही नव्हतं’ असे रवीना म्हणाली. कारगिल युद्धाशी रवीनाच्या या कनेक्शनची आज प्रजासत्ताक दिनी पुन्हा चर्चा रंगलेली दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.