Reema Lagoo: बॉलीवूडमध्ये (bollywood actress) अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी पडद्यावर आईची भूमिका संवेदनशीलपणे साकारली आहे. त्यात अभिनेत्री रिमा लागू (reema lagoo) यांचे नाव घ्यावे लागेल.
चित्रपट असो वा मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली. आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरली. त्यांना 'बॉलीवूडची आई' म्हणूनही बोललं गेलं. आज रिमा लागू यांचा जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने पाहूया त्यांच्या जीवन प्रवासातील काही खास गोष्टी.
(actress reema lagoo birth anniversary special story her career films personal life death)
रिमा लागू यांचे खरे नाव नयन भडभडे असे होते. त्या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री होत्या. आपल्याला अभिनेत्रीच व्हायचं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात मराठी चित्रपटापासून केली होती.
काही काळ मराठीत काम केल्यानंतर त्यांनी हिंदी मालिकांमध्येही काम केले. रिमा लागू यांनी प्रसिध्द मराठी कलाकार विवेक लागू यांच्याशी लग्न केले होते. पण त्यांचे वैवाहित आयुष्य फार काळ टिकले नाही.
त्यांच्यात आणि विवेक लागू यांच्यात झालेल्या तणावामुळे ते नातं संपुष्टात आलं. पतीपासून वेगळं राहत रिमा यांनी मुलीचे संगोपन केले.
रिमा यांनी आपल्या करिअरमध्ये अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त यांच्यासारख्या अभिनेत्यांबरोबर काम केले होते.
महेश भट्ट यांच्या 1990 मध्ये आलेल्या प्रसिध्द अशा 'आशिकी' चित्रपटामध्ये रिमा लागू यांनी आईची भूमिका केली होती. त्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
1994 मध्ये हम आपके है कौन मधील त्यांची भूमिका लोकप्रियता उच्चांक गाठणारी होती. त्यात त्यांचे सहकलाकार म्हणून सलमान खान आणि माधूरी दीक्षित हे कलाकार होते. रिमा लागू यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी काही लोकप्रिय मालिकांमध्येही अभिनय केला.
रिमा यांनी 'यस बॉस' आणि 'कल हो न हो' सिनेमात शाहरुखच्या आईची भूमिका केली होती. सगळ्यांसाठी शाहरुख सुपरस्टार आहे. मात्र रिमा यांच्यासाठी शाहरुख त्यांचा लाडका मुलगा होता. त्या शाहरुखचे खूप कौतुक करायच्या.
रिमा लागू यांचे जाणे बॉलीवूडसाठी मोठी धक्कादायक बाब होती. रिमा यांचा मृत्यु 18 मे 2017 रोजी झाला. रीमा यांनी आपले आयुष्यच मनोरंजन विश्वाला वाहिले होते, याचा उदाहरण म्हणजे मृत्यूच्या एक तास अगोदर देखील त्या शुटिंगमध्ये व्यस्त होत्या.
त्यानंतर त्यांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागले. ज्यावेळी त्या घरी गेल्या तेव्हा त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती. असा रीमा लागू यांचा जीवनप्रवास होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.