वडिलांच्या मृत्यूला हॉस्पिटल जबाबदार; अभिनेत्री संतापली

रूग्णालयामधील व्हिडीओ संभावनाने शेअर करून या रूग्णालयातील नर्सेस आणि इतर स्टाफबद्दल राग व्यक्त केला आहे.
 sk seth and Sambhavna Seth
sk seth and Sambhavna Sethesakal
Updated on

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री संभावना सेठच्या (Sambhavna Seth) वडिलांचे एस. के. सेठ (S.K. Seth) यांचे कोरोनामुळे निधन झाले. संभावनाचे पती अविनाश द्विवेदी (Avinash Dwivedi) यांनी 8 मे रोजी संभावनाच्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. संभावनाने नुकताच रुग्णालयावर गंभीर आरोप करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जयपूरमधील एका रुग्णालयामध्ये संभावनाच्या वडिलांवर उपचार सुरू होते. या रुग्णालयामधील व्हिडिओ संभावनाने शेअर करून नर्सेस आणि इतर स्टाफबद्दल राग व्यक्त केला आहे. (Actress Sambhavna Seth alleged hospital for death of her father)

 sk seth and Sambhavna Seth
Good News : श्रेया घोषालने दिला मुलाला जन्म

व्हिडीओ शेअर करत संभावनाने म्हटले आहे की,‘ त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आहे. जग केवळ ब्लॅक किंवा व्हाईट नसतं. त्याचप्रमाणे डॉक्टरही देवासारखे असू शकत नाहीत. आपल्या प्रियजनांना मारणारे पांढऱ्या कपड्यातही काही वाईट लोक आहेत, हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याच्या दोन तासानंतरच माझ्या वडिलाचं निधन झालं. उपचाराच्या नावाने त्यांची हत्याच केली असंही म्हणता येईल. वडिलांना मी कायमची गमावून बसेल, अशी मला कायम भीती वाटत होती. या काळात मी त्याचा सामनाही केला. आता मी निर्भिड होऊन सत्यासाठी लढणार आहे. माझ्या वडिलांनीच मला निर्भिड होऊन लढायला शिकवलंय. या लढाईत या लोकांना मी पराभूत करेल की नाही माहीत नाही, पण त्यांचं खरे रुप जगासमोर निश्चितच आणेन, वडिलांच्या निधनानंतर सर्व विधी पूर्ण होण्याची मी वाट पाहत होते. आता मला या लढाईत तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण या कठीण काळात रुग्णालयात जाऊन आला आहे, हे मी जाणून आहे. तुम्हालाही अशाच प्रकारच्या वैद्यकीय सेवेच्या निष्काळजीपणाचा सामना करावा लागला आहे. परंतु सर्वचजण विविध कारणामुळे या व्यवस्थेच्या विरोधात लढू शकत नाहीत. परंतु आता आपण सर्व मिळून ही लढाई लढू या.’

 sk seth and Sambhavna Seth
वयाच्या ३९व्या वर्षी आजी बनली 'ही' अभिनेत्री; हृतिकसोबत केलंय काम
 sk seth and Sambhavna Seth
Good News : श्रेया घोषालने दिला मुलाला जन्म

या व्हिडिओला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी संभावनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सोशल मीडियावर ‘जस्टिस फोर संभावना’ अशा हॅशटॅगचा वापर करून अनेकजण संभावनाला रुग्णालयाविरूद्ध या लढ्यात मदत करत आहेत.

मनोरंजन विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.