मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रँचनं अटक केली होती. त्यावेळी अनेक अभिनेत्रींनी राजवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. यात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पुनम पांडे या दोन अभिनेत्रींचा समावेश होता. आता कोर्टानं या दोन्ही अभिनेत्रींना दिलासा दिला आहे. राजला अटक झाल्यानंतर शर्लिन आणि पुनमची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या जबाबामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली होती. सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असणाऱ्या शर्लिननं दरम्यानच्या काळात शिल्पावर अनेक आरोप केले होते. आता तिला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
पॉर्न फिल्म रँकेट प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडेला हायकोर्टानं दिलासा देत 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. 2020 च्या प्रकरणात राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी कामतलाही दिलेला दिलासा कायम सर्व आरोपींची अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राजला आता जामीन मिळाला आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं त्याच्यावर आरोप केले होते. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काम करण्याची ऑफर त्यानं दिली होती. मात्र त्याला नकार दिल्यानंतर त्यानं आपलं नाव आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. अशाच प्रकारचा आणखी एक आरोप अभिनेत्री पुनम पांडेनं केला होता.
शर्लिननचा जवाब पोलिसांनी नोंदवुन घेतला आहे. त्यात तिनं जो खुलासा केला होता. त्यामुळे राज आणखी संकटात येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी राजनं न्यायालयात जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र न्यायालयानं फेटाळला. तसेच शर्लिनचाही अटकपूर्व जामीन फेटाळला होता. शर्लिननं सांगितलं होतं की, त्यानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. मुंबई क्राईम ब्रँचनं तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी तिनं काही धक्कादायक आरोप राजवर केले होते. शर्लिननं यापूर्वी राजवर एप्रिल 2021 मध्ये एक तक्रार केली होती. आताच्या आरोपामध्ये शर्लिननं सांगितलं आहे की, राजनं तिच्यावर बळजबरी केली होती .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.