Shivali Parab: अगं 'म्याड केलंस तू'.. आपल्या चुलबुल्या शिवालीचं भन्नाट गाणं ऐकलं का?

शिवाली परब काही ऐकत नाही.. नव्या गाण्याने घातली भुरळ..
actress Shivali Parab myad kelas tu new song out
actress Shivali Parab myad kelas tu new song out sakal
Updated on

Shivali Parab: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील कलाकार आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाले आहेत. त्यांच्या अभिनय, विनोद शैली यामुळे प्रचंड लोकप्रियता या कलाकारांना मिळाली. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेत्री शिवाली परब.

शिवालीची खरी ओळख 'हास्यजत्रा'तूनच झाली. कल्याणची ही पोरगी आपल्या अभिनयाने आता चुलबुली शिवाली परब म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. हास्यजत्रेच्या मंचावरील तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना प्रभावित करून जाते. आता तर आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मोठी मजल मारली आहे. नुकतंच तीचं एक भन्नाट गाणं प्रदर्शित झालं आहे..

(actress Shivali Parab myad kelas tu new song out )

actress Shivali Parab myad kelas tu new song out
Milind Gawali: अरे आता तरी सोड अरुंधतीला.. लग्न झालंय तिचं.. मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत..

"म्याड केलंय तू"असं या गाण्याचं नाव असून हे गाणे सध्या वाऱ्यासारखे प्रदर्शित झालंय. ह्या गाण्यात खानदेशातील शेतकरी कुटुंबातील विशाल राठोड आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब यांनी धुमाकूळ घातला आहे.

व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनल वर हे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'म्याड केलंस तू' म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे असे आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम सॉंग आहे, १२ मार्चला या गाण्याचा टीजर आला तेव्हापासून गाण्याची चर्चा सुरू होती, अखेर हे गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

या लव्हेबल प्रेमकहाणीला सागर जनार्दन याने संगीत दिलंय. तर या गाण्याचे बोल सागर जनार्दन आणि रोहन साखरे यांनी शब्दबद्ध केले आहेत. तर या रोमँटिक गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि लरीसा अलमेडिया यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलंय.

संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष महाजन याने पेलवली आहे तर संपूर्ण गाण्याला छायाचित्रकार सूरज राजपूत याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सीएम राठोड यांनी गाण्याच्या निर्मितीची बाजू उत्तमरीत्या पेलवली आहे. विशाल राठोड आणि शिवाली परब यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहणं उत्सुकतेच ठरतंय.

विशाल हा मूळचा वडगाव अंबे पाचोरा तालुक्याचा असून त्याने सुरू केलेला अत्यंत मेहनतीचा प्रवास आजही तितक्याच ताकदीने विशाल पेलवत आहे. या गाण्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाचं असणार सिनेसृष्टीविषयीचं स्वप्न नव्याने पूर्ण होताना दिसतंय. निर्मिती आणि अभिनय या सोबतच विशाल स्वतः एक व्यवसायिक आहे. एम.बी.ए फायनान्स मध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विशालला कायमच चित्रपट क्षेत्र आणि नृत्याची आवड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.