प्रत्येक कलाकाराला कायमच ऐतिहासिक भूमिका साकारण्याची इच्छा असते. या निमित्ताने आपण एका वेगळा प्रवास, एक वेगळा विचार अनुभवत असतो. अशीच एक अभिनेत्री जी महाराणी सोयराबाई म्हणून घराघरात पोहोचली ती म्हणजे स्नेहलता वसईकर.
स्नेहलताने आजवर अनेक भूमिका केल्या पण 'स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी साकारलेली सोयराबाई ही भूमिका घराघरात पोहोचली. तर 'अहिल्याबाई होळकर' या मालिकेत ही स्नेहलता महत्वपूर्ण भूमिकेत होती.
सध्या स्नेहलता डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' नाटकातही महाराणी येसुबाईंची भूमिका साकारत आहे. या नाटकाचे सध्या महाराष्ट्रभर दौरे होत आहेत. याच नाटका दरम्यानचा एक व्हिडिओ अभिनेत्री स्नेहलता वसईकरने शेयर केला होता. त्यावरून ट्रॉलर्सने तीला लक्ष्य केले आहे.
(actress snehlata vasaikar trolls after she shares maharani soyarabai look video actress befitting answered)
स्नेहलताने येसुबाईंच्या भूमिकेची तयारी करतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. यावेळी स्नेहलता अत्यंत पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. पण एका नेटकाऱ्याने मात्र तिच्यावर टीका केली आहे.
त्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की, 'महाराणीचा पेहेराव केल्यामुळे कोणी सुसंस्कृत होत नसतं. त्यासाठी महाराणी असावं लागतं. तुमच्या इतर चित्रफिती बघितल्या आहेत, त्यात तुम्ही कुठेच सुसंस्कृत दिसत नाहीत.' अशी कमेंट त्याने केली आहे.
यावर स्नेहलताने देखील सडेतोड उत्तर दिले आहे. स्नेहलता म्हणते, 'माझ्यासाठी सुसंस्कृतपणा विचारांमधून आणि वर्तनातून व्यक्त होतो. तरीही तुम्ही कपड्यावरून जज करू शकता. माझी काहीच हरकत नाही. ( मी हे असले विचार दुर्लक्षितच करते) विचार मांडण्याचं व्यक्ति स्वतंत्र इथे प्रत्येकालाच आहे.'
तिची ही कमेंट तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. म्हणून त्यांनी स्नेहलताला पाठिंबा दिला आहे. नेटकऱ्यांनी त्या ट्रॉलरला चांगलेच सुनावले आहे. 'तुमच्यामधे सुसंस्कृतपणा तर सोडाच पण सरळ विचार करण्याची क्षमता सुद्धा दिसत नाही दादा! असे संकुचित विचारच शिकलात का?' अशा शब्दात ट्रॉलर्सला सर्वांनी सुनावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.