Soha Ali Khan: सोहाचं खाली डोकं वर पाय! सांगितलं फिटनेस सिक्रेट - डुइंग पतौडी प्रिन्सेस अशी ओळख असलेल्या सोहा अली खानला सैफ अली खानची (bollywood actor saif ali khan) बहिण म्हणूनही ओळखलं जातं. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. आता ती गृहिणीच्या भूमिकेत आहे. तिनं अभिनेता कुणाल (bollywood actress soha ali khan) खेमूसोबत लग्न केल आहे. सोशल मीडियावर सोहा ही नेहमीच ट्रेडिंग असते. ती एक फिटनेस फ्रीक सेलिब्रेटी आहे. बॉलीवूडमध्ये (kunal khemu) शिल्पा शेट्टी, समीरा रेड्डी, करिना कपूर खान, मलायका अरोरा, बिपासा बासू या फिटनेस फ्रीक असणाऱ्या सेलिब्रेटी आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद मोठा असल्याचे दिसून आले आहे.
सोहाचा इंस्टावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं आपल्या (bollywood fitness freak) चाहत्यांना तिचं फिटनेसचं सिक्रेट सांगितलं आहे. ते वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी सोहाचं कौतूक केलं आहे. यापूर्वी देखील सोहाच्या फिटनेस व्हिडिओ आणि फोटोंना नेटकऱ्यांनी दाद दिली आहे. सोहा ही सुपर मॉमच्याही भूमिकेत आहे. फॅमिली फोटो शेयर करुन ती सध्या नवीन जॉब करत असल्याचे तिनं चाहत्यांना सांगितले होते. बॉलीवूडमध्ये सोहाच्या वाट्याला फारसं यश आलं नसलं तरी तिनं साकारलेल्या दुय्यम भूमिकांचे कौतूक झाले.
सोहा त्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, आपण जेव्हा कोणताही व्यायाम प्रकार करतो तेव्हा त्याचे बेसिक्स विसरता कामा नये. याचे कारण आपण अनेकदा आपण अपूर्ण माहितीच्या अभावी भलतेच व्यायाम प्रकार करतो. त्याचा वाईट परिणाम प्रकृतीवर होत असल्याचे दिसून आले आहे. फिटनेस ठेवण्यासाठी आहारातील काही गोष्टींवर बंधनं असणं गरजेचं आहे. यावेळी सोहानं तिच्या वर्कआऊटचे फोटो देखील शेयर केले आहेत.
सोहा गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडशी चार हात लांब आहे. तिनं वेबसीरिजकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अभिनेते नसरुद्दीन शहा यांच्यासह त्यांनी एका मालिकेत काम केले आहे. त्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.