Sunny Leone Admit Card goes Viral : यूपी पोलीस कॉन्स्टेबलच्या 60244 पदांच्या भरतीसाठी दोन दिवसांची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेला 48 लाखांहून अधिक उमेदवार बसले आहेत. पहिल्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीला अनेक केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या दरम्यान, कन्नौज जिल्ह्यात एक अॅडमिट कार्ड समोर आले आहे, जे केवळ यूपीमध्येच नाही तर देशभरात चर्चेत विषय ठरले आहे.
हे अॅडमिट कार्ड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावाने जारी करण्यात आलं आहे. यात अभिनेत्रीचे दोन फोटोही देण्यात आले आहेत. ही माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तसेच प्रशासकीय कर्मचारीही सक्रिय झाले.
हे अॅडमिट कार्डनुसार या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील तिर्वा येथील श्रीमती सोनश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षा द्यायची होती. उमेदवारांच्या यादीत या उमेदवाराची माहिती ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कॉलेजला कळताच त्यांना एकच धक्काच बसला. सनी लिओनीच्या नावाने जारी करण्यात आलेले अॅडमिट कार्ड सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. कोणीतरी चेष्ठा करण्याच्या हेतूने हे केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान अॅडमिट कार्ड व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती बोर्डाकडून हे बनावट प्रवेशपत्र असल्याचे सांगण्यात आले. काही उमेदवारांनी अर्ज भरला असता त्यांचे अॅडमीट कार्ड जारी करताना चुकीचा फोटो अपलोड करण्यात आला. रिक्रूटमेंट बोर्डाकडे तक्रार येताच अशा अॅडमिट कार्डची छाननी करून फोटो सेक्शन रिकामा अपलोड करण्यात आला. ज्यांचा चुकीचा फोटो असेल, त्यांनी फोटो आणि आधार कार्ड घेऊन परीक्षा केंद्रावर पोहोचावे, अशा सूचना उमेदवारांना देण्यात आल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.