ख-या पुरुषानं काय करावं?; सनीचं ऐका जरा...

actress sunny leone praised husband Daniel weber in Instagram video said what real men should do
actress sunny leone praised husband Daniel weber in Instagram video said what real men should do
Updated on

मुंबई - अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड अंदाजासाठी सगळीकडे फेमस आहे. बोल्डनेसमध्ये कमालीची सुंदर आणि आकर्षक अभिनेत्री म्हणून सनीची ओळख आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. सनी आपले वेगवेगळे फोटो टाकून फॅन्सचं लक्ष वेधून घेत असते. आता मात्र ती चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिनं केलेलं एक परखड विधान. सनी केवळ तिच्या दिसण्यासाठी प्रसिध्द नाही तर तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सनीनं बॉलीवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे.

सनीनं प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ यांचा चांगला ताळमेळ बसवला आहे. त्यामुळे ती योग्य त्या वेळी फॅमिली आणि सोशल यांचा ताळमेळ ठेवताना दिसते. सनी सोशल मीडियावर तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. आताही तिचा एक फोटो सोशल मीडियावर प्रसिध्द झाला आहे. त्यावर तिनं एक विधान केलं आहे. सनी म्हणते की, ख-या पुरुषानं काय करायला हवं, त्याचं उत्तरही तिनं दिलं आहे. सोशल मीडियावर तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ख-या पुरुषानं नेहमी दुस-यांची मदत केली पाहिजे. विशेषत ज्या महिलांना गरज आहे त्यांची. ज्या महिला समाजात एकट्यानं आपला लढा देत आहेत त्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी अशा पुरुषांवर आहे. हे त्यानं विसरता कामा नये.

त्याचं झालं असं की, सनीच्या पतीनं एका महिलेला गाडीचा टायर बदण्यासाठी मदत केली. त्या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यावेळी सनीनं त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सनीनं सर्व पुरुषांना असे आवाहन केले आहे की, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत महिलांची मदत करायला हवी. सिनेजगतात सनी आणि डॅनियल वेबरच्या जोडीला टिनसेल शहराची सर्वाधिक लोकप्रिय जोडी म्हणून पसंती मिळाली आहे. त्या दोघांची ओळख वेगासमधल्या एका क्लबमध्ये झाली होती. सनी आणि डॅनियलनं 2011 मध्ये लग्न केलं. त्यांनी 2017 मध्ये भारतात येऊन निशा नावाची मुलगी दत्तक घेतली. पुढे तिनं दोन मुलांना सेरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला. 

 एका मुलाखतीच्या दरम्यान सनीनं सांगितलं होतं की, मला अजूनही असे वाटते की, मी शाळेतली एक रोमँटिक मुलगी आहे. मला नेहमी दुस-यांशी बोलायला, त्यांचे ऐकायला, आवडते. सध्या डेटिंगचे नियम बदलले आहेत. तरुणाईमध्ये व्हर्च्युअल डेटिंगचे फॅड वाढत चालल्याचे दिसते. त्यांच्यापुढे अनेक पर्यायही आहेत. त्यांना जे सोपे वाटते त्याचा ते लगेच रोजच्या जगण्यात वापर करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.