गेली काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडलेला 'आदिपुरुष' सिनेमा अखेर 16 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण भारतात सध्या 'आदिपुरुष' चीच चर्चा आहे. कारण हा चित्रपट आधी टीजर मुळे वादात अडकला होता, आणि रिलीज नंतर हा वाद अधिक चिघळला आहे.
चित्रपटातील व्हिएफएक्स, पात्रांचे कपडे, रावणाचा अवतार, हनुमानाचा संवाद सगळ्यावरच लोक सडकून टीका करत आहे. पण एकीकडे टीका होत असली तरी या सगळ्यात अभिनेत्री तेजस्विनी पंडित मात्र चांगलीच भाव खाऊन गेली आहे.
ओम राऊत दिग्दर्शित या सिनेमात मराठी अभिनेता देवदत्त नागे असणार हे सर्वांनाच ठाऊक होते, या चित्रपटात तेजस्विनीचे दिसणे हे सर्वांनाच आश्चर्य आणि आनंद देऊन केले.
एका बिग बजेट सिनेमात तेजस्विनी झळकल्याने तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. पण या चित्रपटात काम करून तिला नेमकं कसं वाटलं यावर ती पहिल्यांदाच बोलली आहे.
(Actress tejaswini pandit shares experience of working in adipurush movie with prabhas saif ali khan om raut)
'आदिपुरुष' मध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने शूर्पणखाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेत ती अत्यंत रेखीव आणि सुंदर दिसत आहे. पण एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता याबाबत तिने आपल्या भावना नुकत्याच व्यक्त केल्या आहेत.
एका माध्यमाल दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'या चित्रपटात मी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे शूर्पणखेची. या चित्रपटाचा मला भाग होता आलं की माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.'
'ओम राऊत मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत असल्यापासून त्याची आणि माझी मैत्री आहे. तो या चित्रपटात शूर्पणखाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होता आणि मी त्याची पहिली पसंती होते.'
'त्याने केलेल्या अभ्यासातून त्याला हे जाणवलं की शूर्पणखा खूप सुंदर होती. त्यामुळे या भूमिकेसाठी मला कास्ट करण्याबाबत तो ठाम होता.'
तेजस्विनी पुढे म्हणाली, 'या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता. या चित्रपटात माझ्याबरोबर कोण काम करणार हे कळल्यावर मी खूपच खुश झाले होते. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्याबरोबर मला स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली.'
'या सर्वांचा अभिनय क्षेत्रातील अनुभव हा खूप दांडगा आहे. याचबरोबर ते खूप नम्र आणि सहकलाकाराला सांभाळून घेत काम करणारे कलाकार आहेत.' अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या चित्रपटात,सुपरस्टार प्रभास प्रभू रामाच्या, क्रिती सनन सीता मातेच्या आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३४० कोटींची कमाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.