अभिनेत्री 'बाईंना' मीराबाई चानू माहित नाही; मग ट्रोल तर होणारच!

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर मीराबाईला शुभेच्छा दिल्या.
tisca chopra,  mirabai chanu
tisca chopra, mirabai chanu file image
Updated on

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदकाचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू (mirabai chanu) हिने रौप्य पदक पटकावलं आहे. 49 किलो वजनी गटात तिने ही कामगिरी केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी मीराबाईला शुभेच्छा देत पोस्ट शेअर केल्या आहे. बॉलिवूडमधील तापसी पन्नू, फरहान अख्तर, सोफी चौधरी आणि सनी देओल या कलाकारांनी पोस्ट शेअर करून मीराबाईला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री टिस्का चोप्राने (tisca chopra) देखील मीराबाईला शुभेच्छा देत ट्विट शेअर केले. पण आता टिस्काला तिच्या या ट्विटमुळे अनेकांनी ट्रोल केलं आहे. (actress tisca chopra got trolled due to her tweet on mirabai chanu)

टिस्काने ट्विटमध्ये शेअर केला मिराबाईचा चुकीचा फोटो

मीराबाई शुभेच्छा देण्यासाठी टिस्काने ट्विट केले, 'आम्हाला तुझा अभिमान वाटतो. @mirabai_chanu #Tokyo2021 #Olympics2021 #indiaattheolympics ' या ट्विटसोबत टिस्काने मीराबाईचा फोटो शेअर करण्याऐवजी इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आइसा विंडी कैंटिकाचा फोटो शेअर केला. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'या मीराबाई नाहित. या इंडोनेशियाईची वेटलिफ्टर आहेत ज्यांनी कांस्य पदक जिंकले'. तर दुसऱ्याने कमेंट केली 'या मीराबाई नाहित कृपया आपलं ज्ञान वाढवावे'

twitter
twitterfile image
tisca chopra,  mirabai chanu
रणवीरचा पुन्हा अतरंगी लूक; चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

मीराबाई चानूने क्लिन आणि जर्कमध्ये 115 किलो वजन उचललं तर स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचललं. तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पटकावल्यानंतर खरंच स्वप्न पूर्ण झाल्याचं तिने म्हटलं आहे. रौप्य पदक देशाला अर्पण करत आहे. तसंच या प्रवासात पाठिंबा दिलेल्या सर्व भारतीयांचे आभार चानूने मानले आहेत.

tisca chopra,  mirabai chanu
Bigg Boss OTT: करण जोहर करणार सूत्रसंचालन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.