'द केरळ स्टोरी' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे मात्र त्याचबरोबर या चित्रपटाच्या कमाईचे आकडेही दिवसेंदिवस वाढत आहे.
एकीकडे तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
वाद जितका जास्त तितकी कमाई देखील जास्तच होते असं म्हटलं जात आणि तसचं काहीस द केरळ स्टोरी बाबत घडलेलं दिसत आहे.
इतक्या वादनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अवघ्या पाच दिवसातच या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर हाफ सेंच्यूरी पुर्ण केली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या नुसार, 'द केरळ स्टोरी' ने पहिल्या दिवशी 8.3 कोटी रुपयांची कमाई केली. शनिवारी 11.22 कोटी आणि रविवारी या चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे 16.40 कोटींचा व्यवसाय केला.
जर सोमवारच्या कमाईच्या आकडे पाहिले असता या चित्रपटाने 10.7 कोटींचा गल्ला जमावला आहे. तर मंगळवारी या चित्रपटाची कमाई 11 कोटींचा जवळपास आहो.
या बॉक्स ऑफिस कलेक्शनसह, चित्रपटाने आतापर्यंत एकूण 57.62 कोटींची कमाई केली आहे. द केरळ स्टोरी लवकरच बॉक्स ऑफिसवर शतक पुर्ण करेल अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
'द केरळ स्टोरी' याचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. तर कलाकारांबद्दल सांगायचं झाल तर अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटात अदा शर्मानं शालिनीची भुमिका अत्यंत दमदार पद्धतिने साकरलेली आहे.जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
हा चित्रपट साधारण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला पाहता येवु शकेल असा अंदाज आहे. चित्रपटाचे स्ट्रीमिंग अधिकार ZEE5 ने आणले आहेत, अशी माहिती समोर आली आहे आणि एकदा तो स्ट्रीमिंगसाठी तयार झाल्यावर तो प्लॅटफॉर्मवर पाहिला जाऊ शकतो. असा दावाही करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.