The Kerala Story च्या अदा शर्माचा लीक झाला मोबाईल नंबर..पुढे जे घडलं ते धक्कादायक..

अदा शर्माचा मोबाईल नंबर लीक झाल्यानंतर आता मुंबई पोलिस या प्रकरणात सक्रिय झाली आहे.
Adah Sharma Phone Number leaked on social Media
Adah Sharma Phone Number leaked on social MediaGoogle
Updated on

The Kerala Story: अदा शर्मा अभिनित 'द केरळ स्टोरी' सिनेमानं २०० करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. ५ मे २०२३ रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. अनेक वादांच्या वादळातही सिनेमानं नांगी नाही टाकली उलट दोन हात करत शत्रूला नामोहरम करणारी कमाई करुन दाखवलं.

'द केरळ स्टोरी' सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आता अदा शर्माच्या करिअरला चांगलं वळण मिळालं आहे. हा सिनेमा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो.पण असं असलं तरी या सिनेमामुळे अदा पुन्हा अडचणीत सापडली आहे. (Adah Sharma Phone Number leaked on social Media)

Adah Sharma Phone Number leaked on social Media
Jui Gadkari: 'तू मला..मी तुला..गुणगुणू लागलो..'
Adah Sharma Phone Number leaked on social Media
Aditya Singh Rajput Death update: आधी कॉल मग लगेच मेसेज.. निधनाच्या काही तास आधी असं काय बोललेला आदित्य त्याच्या आईशी

एकीकडे जिथे द केरळ स्टोरीचं यश अदा शर्मा सेलिब्रेट करत आहे तिथे दुसरीकडे सोशल मीडियावर तिला धमक्या मिळत असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच एका इन्स्टाग्राम युजरनं अभिनेत्रीचे फोन नंबर डिटेल्स लीक केले आहेत, एवढंच नाही तर त्यानं पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्रीला धमकी दिली होती की तो तिचा नवीन नंबर देखील लीक करेल. जशी ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तसं लागलीच मुंबई पोलिसांना याची खबर मिळाली.

ज्या नेटकऱ्यानं अदा शर्माला तिचा नवीन नंबर लीक करण्याची धमकी दिली होती त्यानं काही वेळानंतर आपली पोस्ट डिलीट केली आणि अकाउंट निष्क्रिय केलं. पण यानंतरही त्यानं केलेली पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेत्रीला व्हायरल नंबरवर धमक्या मिळत आहेत. असं असलं तरी अदा शर्मानं यावर कोणतीच अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Adah Sharma Phone Number leaked on social Media
Pushpa 2 Release Date: शाहरुखला बॉक्सऑफिसवर नडणार 'पुष्पा'.. अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा 2' ची रिलीज डेट आली समोर

सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी सिनेमा हा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला गेला,ज्यात केरळमधून ३२००० मुली गायब झाल्या,त्यांना इस्लाम धर्म स्विकारायची जबरदस्ती केली गेली..आणि ISIS संघटनेत सामिल केलं गेलं. सिनेमाच्या या कथानकामुळे दक्षिण भारताच्या अनेक राज्यात या सिनेमाच्या स्क्रीनिंगवर बंदी आणली गेली. आतापर्यंत सनेमातील अन्य कलाकारांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.