Adarsha Shinde News: गायक आनंद शिंदे आणि त्यांच्या परिवारावर महाराष्ट्रातील अनेकांनी भरभरुन प्रेम केलं. शिंदेशाहीची चौथी पिढी आज गायन क्षेत्रात स्वतःची ओळख जपून आहे. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदेशाहीने नवीन व्यवसायात पदार्पण केलंय.
गायक डॉ. उत्कर्श शिंदेने सोशल मिडियावर पोस्ट करुन याविषयी माहिती दिलीय. वाचा सविस्तर.
शिंदेशाहीने स्वतःचं पहिलं पेट्रोलपंप सुरु केलंय. उत्कर्श शिंदेने सोशल मीडियावर पेट्रोल पंप उद्धाटनाचे फोटो शेअर केलेत. याखाली कॅप्शनमध्ये उत्कर्श लिहीतो, “छत्रपती शिवबा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतीबा,अण्णा भाऊ,ते अन्य महात्म्यांच्या विचारांना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे”
.बाबासाहेब तुम्ही म्हणालात -शिका !आम्ही गायक,डॉक्टर इंजिनिअर झालो .
तुम्ही म्हणालात संघटित व्हा ! !संघर्ष करा
तर आम्ही एक कुटुंब राहून प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत पुढे सरसावलो."
उत्कर्श पुढे लिहीतो, "रस्त्यावर भजन गाणारी एक पिढी मंदिरात देवाला जागवणारी दुसरी पिढी,लोकसंगीतातून महाराष्ट्राला सण साजरे करताना नाचवणारी तिसरी पिढी ते आज चित्रपटातून सर्वांच्या गळ्याचे ताईत होणारी चौथी पिढी. न थकता न थांबता फक्त कामाला प्रेम करणारे महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन “तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या ब्रीदवाक्याला सैदव मनात कोरून,काम करणारे आमचे शिंदे कुटुंब.भजन,कवाली,गायन ,चित्रपट गीते,आता चित्रपटात अभिनेता ते डॉक्टर डिग्री दवाखाने ते आता उद्योग जगात पदार्पण करत शिंदे परिवाराच पाहिलं पेट्रोल पंप. वेळापूर (पंढरपुर)येथे सुरू झालं.
उत्कर्श शेवटी लिहीतो, "आता विषय पंपावर. छत्रपती शिवबा ,महात्मा जोतीबा,अण्णा भाऊ,ते अन्य महात्म्यांच्या विचाराना आदर्श मानले म्हणूनच आमचा उत्कर्ष होत आहे.रसिक माय बापाने भर भरून प्रेम दिले त्या प्रेमाची परतफेड आम्हाला कधीच करता येणार नाही.आम्ही हर्षद आदर्श उत्कर्ष असेच मेहनत करत राहू पण त्याला साथ हवी तुमच्या आशिर्वादाची. क्यूकी
ज़िंदगी कि असली उड़ान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तेहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है."
शिंदेशाहीने स्वतःचं पेट्रोल पंप सुरु केल्याने सर्वजण त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.