'होम मिनिस्टर'ला 18 वर्षे पूर्ण! यावेळी आदेश बांदेकरांनी जे केलं ते पाहुन..

13 दिवसांसाठी सुरू झालेल्या झी मराठी वरील 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाला आज 18 वर्षे पूर्ण झाली.
adesh bandekar shared emotions on accasion of his home minister show complete 18 years
adesh bandekar shared emotions on accasion of his home minister show complete 18 years sakal
Updated on

aadesh bandekar : आदेश बांदेकर म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे भाऊजी. होम मिनिस्टर या मालिकेतून ते घराघरात पोहोचले. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आदेश बांदेकर यांनी मुशाफिरी केली.एवढच नाही तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. आदेश बांदेकर यांची खास बात म्हणजे ते गेली कित्येक वर्षे सातत्याने 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम करत आहेत. आज महाराष्ट्रातच नाही तर जगभरात या कार्यक्रमाची ख्याती आहे. नुकतीच या कार्यक्रमाला 18 वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने आदेश बांदेकरांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (adesh bandekar shared emotions on accasion of his home minister show complete 18 years )

झी मराठीने नुकतंच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत आदेश बांदेकरांसोबतच होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या पडद्यामागचे कलाकारदेखील आहेत. यावेळी आदेश बांदेकर काहीसे भाऊक झालेले दिसतात. ते म्हणतात, 'आमच्या सर्वांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण. कारण १३ सप्टेंबर २००४ हा दिवस कधी इतका मोठा इतिहास घडवेल असं वाटलं नव्हतं. फक्त १३ दिवसांसाठी सुरु झालेला हा कार्यक्रम आणि आज १३ सप्टेंबर २०२२ ला त्याला १८ वर्ष पूर्ण होत आहेत. मी भाग्यवान की महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन ही आनंदयात्रा आणि या आनंदयात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं. जी जी स्वप्न पाहिली होती, ती सगळी पूर्ण झाली. या कार्यक्रमानं वेगळा आशीर्वाद दिला. हे मायबाप प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि अर्थात माझ्याबरोबर असणाऱ्या असंख्य पडद्यामागचे कलाकार यांचे आभार. झी मराठीचे खूप खूप धन्यवाद. जगाच्या नकाशावर रोज एका कुटुंबाला बोलतं करणारा आणि इतकी वर्ष चालणारा एकही कार्यक्रम नाही,' असे आदेश बांदेकर म्हणाले.

यावेळी बांदेकरांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमात पडद्यामागे गेल्या १८ वर्षांपासून काम करणारे स्पॉट बॉय मिथिलेश यांच्या हातून केक कापला. बांदेकर या टीमचं कौतुक करत म्हणाले की, 'करोना काळात कार्यक्रम बंद होता, तरीही ही टीम इथेच राहिली. दुसरीकडे गेली नाही. त्यांना विश्वास होता कि आपला कार्यक्रम पुन्हा सुरू होईल.' आदेश यांनी 18 वर्षे हा कार्यक्रम घराघरात आणि मनामनात पोहोचवला. असे असतानाही त्यांनी कार्यक्रमाच्या स्पॉट दादांच्या हस्ते केक कापला, ही बाब नेटकऱ्यांना प्रचंड आवडली आहे, त्यामुळे आदेश यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.