Adipurush 10 Good Things Must watched movie : रामायणावर आधारित आदिपुरुष प्रदर्शित होण्यापूर्वी जी वातावरण निर्मिती करण्यात आली होती त्याची चर्चा अधिक होती. ओम राऊत दिग्दर्शित यांच्या या चित्रपटानं चार दिवसांत दोनशे कोटींपेक्षा अधिक कमाई केल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडियावर भलेही या चित्रपटावर प्रचंड टीका होत असेल मात्र त्यातील चांगल्या गोष्टींकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधणेही गरजेचे आहे.
ओम राऊत यांनी आपण कट्टर रामभक्त असून प्रेक्षकांच्या मनाला वेदना होतील अशा प्रकारे कोणतेही पाऊल उचलणार नाही. असे सांगितले होते. प्रभु श्रीराम यांची जीवनगाथा वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांनी पूर्वी पाहिलेल्या रामायणाचा संदर्भ डोक्यात न ठेवता एक वेगळी कलाकृती म्हणून पाहायला जा.असे आवाहन मेकर्सकडून करण्यात आले होते.
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
आदिपुरुषला नावं ठेऊ नका, या १० गोष्टी आवर्जून पाहण्यासारख्या आहेत....
१. वातावरण निर्मिती - आदिपुरुष ज्यांनी पाहिला असेल त्यात या चित्रपटानं वेगळई वातावरण निर्मिती करण्यात प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. पात्रांचे आवाज, डबिंग, वेगवेगळे साउंड इफेक्ट आणि त्यातून कथानकाचे केलेले सादरीकरण कमालीचे प्रभावी आहे. ज्यांनी हा चित्रपट ३ डी इफेक्टमध्ये पाहिला असेल त्यांना आदिपुरुषची वातावरण निर्मिती दिग्दर्शक यशस्वी झाल्याचे दिसून येईल.
२. चित्रपटानं आतापर्यत केलेली कमाई - कुणी काही का म्हणेना पण शेवटी चित्रपटाचे यश हे त्यानं किती कमाई केली यावर अवलंबून असते. आदिपुरुष प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचे अॅडव्हान्स बुकींग छप्पर पाड होते. वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील त्याच्या कमाईसाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. काहींनी दहा हजारांहून अधिक तिकीटं बूक केली होती. १६ जून रोजी प्रदर्शित झालेल्या आदिपुरुषनं आतापर्यत तीनशे कोटींची कमाई केली आहे. जी मोठी कामगिरी म्हणता येईल.
३. आदिपुरुषचे संगीत - प्रसिद्ध संगीतकार अजय-अतूलच्या संगीतानं आदिपुरुषला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास जय श्रीराम, जय श्रीराम राजाराम नावाच्या गाण्यातून प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. याशिवाय या चित्रपटाचे पार्श्वसंगीतही प्रभावी आहे. ज्यातून आदिपुरुष पाहताना अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहत नाही.
४. थ्री डी इफेक्ट - आता सोशल मीडियावर आदिपुरुषच्या निर्मितीला नावं ठेवण्यात धन्यता मानत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून भारतानं थ्री डी तंत्रज्ञानात प्रभावी कामगिरी केली आहे. आपण जर नेहमीच हॉलीवूडच्या धर्तीवर बॉलीवूडच्या चित्रपटांची तुलना करु लागल्यास आपल्याकडे जे चित्रपट तयार होतात त्याच्या निर्मिती मुल्याचे कौतूक होणार नाही. हे लक्षात घेण्याची गरज आहे. आदिपुरुषमध्ये काही प्रसंग अंगावर येणार आहेत. त्यातील थ्री डी इफेक्ट कौतूकाचा विषय आहे.
५. दिग्दर्शन -
ओम राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे यापूर्वीच्या रामायणावर आधारित चित्रपटांपेक्षा हा चित्रपट वेगळाच आहे. त्यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या सुरुवातीच्या श्रेय नामावलीत रामायणाची सुरुवात, रामाचा जन्म, त्याचा राज्यभिषेक आणि त्याचे वनवासात जाणे या गोष्टी सांगितल्या आहेत. दिग्दर्शकाला रामाची युद्धातील भूमिका, त्याचे नेतृत्व, त्याचे संघटनकौशल्य, त्याचे युद्धकौशल्य या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे होते. ज्यात तो यशस्वी झाल्याचे दिसते.
६. छायांकन - (सिनेमॅटोग्राफी)
आदिपुरुषच्या छायांकनाची जबाबदारी ही पलानी कार्तिक यांनी पार पाडली आहे. जी प्रभावी आहे. आदिपुरुष हा काही तिच ती रामायणाची कथा सरळसोटपणे सांगणारा चित्रपट नसून तो युद्ध, तपश्चर्या, संघर्ष आणि न्यायाविषयी भाष्य करणारा आहे. या सगळ्या गोष्टी कॅमेऱ्याच्या माध्यमातून सांगताना पलानी यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी लक्ष वेधून घेणारी आहे. हे आवर्जून सांगावे लागेल.
७. कलाकारांची भूमिका -
श्रीरामच्या भूमिकेतील प्रभास, रावणाच्या भूमिकेतील रावण आणि सीतेच्या भूमिकेतील क्रिती सेनॉन यांचे कौतूक करावे लागेल. त्यांनी आपआपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. राम हा कुणी देव नसून सर्वसामान्य व्यक्ती आहे आणि तो आपल्यावर आलेल्या संकटाच्या विरोधात लढतो आहे हे दिग्दर्शकानं दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याला न्याय देण्यात प्रभास यशस्वी झाला आहे. तो राम म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला आहे. म्हणून की काय यापूर्वी बाहूबलीच्या भूमिकेतील प्रभास यात पूर्णपणे वेगळा वाटतो.
यासगळ्यात रावणाच्या भूमिकेतील सैफ अली खाननं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. सैफनं साकारलेला रावण ही त्याची आजवरची सर्वोत्तम भूमिका म्हणता येईल. अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन येत आहेत.
८. प्रेक्षकांना भावनिक आवाहन करण्यात यशस्वी
न्याय - अन्याय, सत्य - असत्य यांच्यातील संघर्ष मग तो भावनिक आहे, राजकीय आणि धार्मिक स्वरुपाचा देखील आहे. त्यातील अनेक गोष्टी आदिपुरुषमध्ये दिग्दर्शक ओम राऊत यांनी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांनी ही कथा आपल्या शैलीतून सांगण्याचा प्रयत्न केला त्याला प्रेक्षकांनी स्विकारले आहे. म्हणून तर त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
९. मिळालेला प्रतिसाद -
कुणी कितीही नावं ठेवली तरी आदिपुरुषला मिळणारा प्रतिसाद प्रचंडच आहे हे दिसून आले आहे. सोशल मीडियावर त्याची प्रचंड चर्चा आहे. वादग्रस्त असे काही चित्रपटात नाही. मात्र काहींनी या चित्रपटाला यापूर्वीच्या काही चित्रपट आणि मालिकांशी तुलना केल्यामुळे झालेला वाद चित्रपटासाठी मारक ठरतो आहे.
२०२३ मध्ये रामायणावर चित्रपटाची निर्मिती करताना त्यात काही बदल अपेक्षित आहेत. मात्र दिग्दर्शकानं त्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली आहे.
१० . वेगळी मांडणी, वेगळी शैली -
तुम्ही आदिपुरुष जर काळजीपूर्वक पाहिला तर काही गोष्टी तुम्हाला ठळकपणे जाणवतील. त्या म्हणजे २०२३ मधले रामायण आणि त्यातील पात्रं ही वेगळी आहेत. त्यांचे राहणीमान, त्यांचे वावरणे हे वेगळे आहे. दिग्दर्शकानं त्या गोष्टी वेगळ्या धाटणीनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कदाचित प्रेक्षक म्हणून या गोष्टी आपल्याला त्या स्विकारणे शक्य न झाल्यानं त्यावरुन वाद होताना दिसतो आहे. पात्रांची वेशभूषा, त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे दिसणे, लार्जर दॅन लाईफ फिल यावा म्हणून वापरण्यात आलेल्या वेगळ्या लेन्स याकडे आपले लक्ष गेलेच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.