Adipurush Actress Kriti Sanon: 'आदिपुरुष' हा यावर्षीचा बहूप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाच्या टिझर नंतर बराच वाद झाला होता. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर टाकलं. त्यानंतर ९ मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
यात प्रभु रामच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आणि लंकेशपती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसत आहे.
मुंबईतील ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये आघाडीची अभिनेत्री क्रिती सॅनन, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांच्यासह संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होते.
क्रिती सॅननने इव्हेंटमधील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं. आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचवेळी क्रिती सॅनन खूपच सुंदर दिसत होती. तिने चित्रपटात सीता मातेची भूमिका साकारली असून ट्रेलर लॉन्चच्या वेळीही क्रिती देसी स्टाईलमध्ये साडी परिधान करून आली होती.
क्रितीने लाल आणि पिवळी बॉर्डर असलेली पांढरी साडी घातली होती. साडीला चमकदार लुक देण्यासाठी तिने पिवळा ब्लाउज घातला होता. हातात बांगड्या आणि केसात गजरा लावुन तिनं अगदी परफेक्ट लुक कॅरी केला होता.
आदिपुरुषमध्ये क्रिती सॅनन पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे आणि सुपरस्टारसाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमादरम्यान प्रभासबद्दल विचारले असता तिने त्याचे कौतुकही केले. ती म्हणाली, 'प्रभास हा प्रभू रामसारखा साधा आहे, एवढेच मी म्हणू शकते.'
दरम्यान हा चित्रपट रिलिजपुर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याच दिसलं आहे. मग अगदी चित्रपटातील रामाच्या भुमिकेत असो किंवा लकेंशच्या भुमिकेत नेटकऱ्यांनी टिझरनंतर चित्रपटात डझनभर चुका काढल्या होत्या. त्यानंतर जेव्हा माता सितेचं पोस्टर रिलिज झालं त्यानंतरही सितेच्या भांगेत कुंकू का नाही त्याचबरोबर तिच्या लूकवरुनही अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात आले होते.
याबद्दल बोलतांना क्रितीने सांगितले की, "पुर्ण श्रद्धेने आणि प्रेमाणे सितेचं पात्र साकारण्याचा मी प्रयत्न केला आहे. बाकी तर ते देव आहेत आणि आपण माणसं आहोत, काही चुक झाली असेल तर माफ करा" असं आवाहन तिने प्रेक्षकांना केलं आहे.
कृतीच्या या वाक्य सर्वांनाच खुप भावलं. क्रिती सेनॉनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.