Adipurush Advance Booking prabhas kriti sanon film : बॉलीवूडमध्ये तब्बल चारशे कोटींचे बजेट घेऊन आलेल्या आदिपुरुषबद्दल वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होताना दिसते आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. सध्या सोशल मीडियावर आदिपुरुषच्या नावाची चर्चा रंगली आहे.
यापूर्वी बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरनं गरीब मुलांसाठी आदिपुरुषची दहा हजार तिकिटं खरेदी केली होती. त्यानंतर काश्मिर फाईल्सचे निर्माते यांनी देखील आदिपुरुषची दहा हजार तिकीटं खरेदी केली होती. यासगळ्यात आणखी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रदर्शनापूर्वीच एक मोठा विक्रम ओम राऊत यांच्या आदिपुरुषनं आपल्या नावावर केला आहे. Adipurush Advance Booking prabhas kriti sanon film
Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा
सुरुवातीला जेव्हा टीझर आला तेव्हा हा काहीही झालं तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका देशातील काही हिंदूत्ववादी संघटनांनी घेतली होती. याशिवाय काही राजकीय पक्षांनी देखील या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर दिग्दर्शकानं आपण आता यात काही बदल केले असून कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजीही घेतली आहे. असे सांगितले होते. त्यानंतर आता आदिपुरुष एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे.
११ जूनपासून आदिपुरुषचे अॅडव्हान्स बुकींग सुरु झाले आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बूकींगला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाचे तब्बल दीड लाख तिकिटं विकली गेली आहेत. असे सांगण्यात आले आहे. ज्याची किंमत ही पाच कोटींच्या आसपास आहे. याचा अर्थ आदिपुरुषनं पहिल्याच आठवड्यातील अॅडव्हान्स बुकींगमधून पाच कोटींची कमाई केली आहे.
असं म्हटलं जातंय की हा चित्रपट पहिल्याच दिवशी शंभर कोटींची कमाई करणार. आता हे खरं की खोटं हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच. पण एकुणच हा चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहचविण्यात निर्मात्यांना यश आले आहे. असे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदिपुरुषची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. काही चित्रपट समीक्षकांनी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.
आदिपुरुष हा येत्या शुक्रवारी (१६ जून) भारतात पाचपेक्षा अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान, प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंह आणि देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभासनं या चित्रपटामध्ये भगवान श्रीराम यांची तर क्रितीनं सीतेची भूमिका साकारली आहे.
रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.