Adipurush Nepal: काठमांडू मध्ये आदिपुरुष वर बंदी, यापुढे कोणताही बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार नाही

नेपाळ काठमांडू मध्ये आदिपुरुष सिनेमावर बंदी घालण्याचे पत्रक जारी करण्यात आली आहे
adipurush banned in nepal kathmandu prabhas om raut kriti sanon saif ali khan
adipurush banned in nepal kathmandu prabhas om raut kriti sanon saif ali khan SAKAL
Updated on

Adipurush Banned In Nepal Kathmandu News: आदिपुरुष रिलीज होऊन आता ३ दिवस झालेत तरीही वाद काही संपत नाहीत. आदिपुरुष पाहायला लोकांनी गर्दी केली हे उघडच आहे.

पण सिनेमावर लोकं सडकून टीका करत आहेत हेही सत्य नाकारता येणार नाही. आता आदिपुरुष संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे नेपाळ काठमांडू मध्ये आदिपुरुष सिनेमावर बंदी घालण्याचे पत्रक जारी करण्यात आली आहे.

(adipurush banned in nepal kathmandu prabhas om raut kriti sanon saif ali khan)

adipurush banned in nepal kathmandu prabhas om raut kriti sanon saif ali khan
Pujappura Ravi Death: दिग्गज मल्याळम अभिनेते पुजापूरा रवी यांचं निधन, ८०० पेक्षा जास्त सिनेमात केलंय काम

TV च्या वृत्तानुसार, आजपासून (सोमवार) काठमांडूमध्ये हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचं पत्रक काढण्यात आलं आहे.

शहराचे महापौर बालेन यांच्या या आदेशावर माहिती आणि दळणवळण मंत्रालयाने नेपाळ सरकारच्या वतीने गंभीर आक्षेप नोंदवला आहे.

मंत्रालयाने निवेदन जारी करून आदिपुरुषसह सर्व चित्रपटांच्या प्रदर्शनावर कोणत्याही प्रकारची बंदी ही बेकायदेशीर ठरवली आहे.

काय आहे वाद?

खरे तर आदिपुरुष हा चित्रपट नेपाळमध्ये रिलीज झाला. पण सिनेमावर आक्षेप घेण्यात आला. सीतेला भारताची कन्या संबोधल्याच्या डायलॉगवरून वाद आणि विरोध सुरू झाला.

यानंतर नेपाळच्या सेन्सॉर बोर्डाने या वादग्रस्त संवादातून भारत हा शब्द म्यूट करण्याची परवानगी दिली होती.

मात्र काठमांडूच्या महापौरांनी आदिपुरुषच्या निर्मात्याकडे मूळ चित्रपटातून तो संवादच काढून टाकण्याची मागणी केली.

बालेन साह यांनी इशारा दिला होता की, मूळ चित्रपटातील संवाद तीन दिवसांत काढून टाकले नाहीत तर काठमांडूमध्ये एकही हिंदी चित्रपट होऊ दिला जाणार नाही.

adipurush banned in nepal kathmandu prabhas om raut kriti sanon saif ali khan
शाळेत जाणारी ही क्युट मुलगी आज मोठी गायिका.. ओळखलं का? Marathi Actress

शुक्रवारी प्रदर्शित झालेला आदिपुरुष काठमांडूसह नेपाळमधील सर्व चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल चालू आहे.

मात्र सोमवारपासून काठमांडूतील चित्रपटगृह आणि मल्टिप्लेक्समध्ये आदिपुरुषसह कोणताही हिंदी चित्रपट न दाखवण्याचा आदेश महापौरांनी जारी केला आहे.

दुसरीकडे, महापौरांच्या सूचनेवरून काठमांडू पोलिसांनी सर्व चित्रपटगृहांना हिंदी चित्रपट न दाखवण्याची सूचना केली आहे. सूचनांचे उल्लंघन केल्यास दंडासह लॉकडाऊन करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर काठमांडूचे महापौर बालेन साह यांच्या तुघलकी फर्मानाला नेपाळ सरकारने मात्र विरोध केला आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,

आदिपुरुषाचा संवाद, ज्यावर लोकांनी आक्षेप घेतला, तो म्यूट करून थिएटरमध्ये चालवण्याची परवानगी देण्यात आली. असे असूनही काही लोकांनी सिनेमाला विरोध करणे योग्य नाही.

adipurush banned in nepal kathmandu prabhas om raut kriti sanon saif ali khan
माझी लेक सानुली.. हे आहेत मराठी अभिनेत्रींचे 'बाप'माणूस Fathers Day 2023

नेपाळच्या सेन्सॉर बोर्डाने भारत हा शब्द काढून प्रसारणाचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याचा निषेध करणे योग्य नाही.

नेपाळमध्ये कोणता चित्रपट चालणार की नाही याबाबत सरकारने एक सेन्सॉर बोर्ड स्थापन केले आहे आणि अशा वादात सेन्सॉर बोर्ड अंतिम निर्णय घेतो.

त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाराबाहेर जाऊन बेकायदेशीर मार्गाने कोणत्याही सिनेमाचं प्रदर्शन थांबवणे हे बेकायदेशीर आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.