Adipurush: आदिपुरुष रिलीज झाला अन् नेपाळमध्ये राडा पेटला.. सीतेच्या जन्मस्थान वादाबद्दल सिनेमावर बंदी

नेपाळमध्ये 'आदिपुरुष'चे प्रदर्शन आणि प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा संपूर्ण वाद.
Adipurush: आदिपुरुष रिलीज झाला अन् नेपाळमध्ये राडा पेटला.. सीतेच्या जन्मस्थान वादाबद्दल सिनेमावर बंदी
Updated on

Adipurush Banned In Nepal News: ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुसरीकडे या चित्रपटाबाबत नेपाळमध्ये बराच गदारोळ झाला असून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

हे पाहता नेपाळमध्ये 'आदिपुरुष'चे प्रदर्शन आणि प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हा संपूर्ण वाद.

(Adipurush Banned Over Sita's Birthplace Controversy in nepal)

Adipurush: आदिपुरुष रिलीज झाला अन् नेपाळमध्ये राडा पेटला.. सीतेच्या जन्मस्थान वादाबद्दल सिनेमावर बंदी
Adipurush Movie: आदिपुरुषमध्ये दिसली मराठमोळी शूर्पणखा.. पाहून तुम्हीही म्हणाल, कमाल

काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी गुरुवारी चित्रपटातील संवादाच्या एका ओळीवर आक्षेप घेतला, ज्यात सीतेला 'भारताची मुलगी' म्हणून दाखवले आहे.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की 'सीता नेपाळची कन्या असावी' आणि ते म्हणाले की निर्मात्यांना चित्रपट शेड्यूलनुसार प्रदर्शित करायचा असेल तर ही ओळ बदलण्यासाठी तीन दिवस आहेत.

या आक्षेपानंतर महापौर शहा यांनीही हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता महापौर शहा यांच्या या मागणीचा 'आदिपुरुष'च्या प्रदर्शनावर कसा परिणाम होईल हे पाहावे लागेल.

महापौर बळेंनी सोशल मीडियावर ट्विट करून आपला निषेध व्यक्त केला आणि म्हटले की, “जोपर्यंत दक्षिण भारतीय चित्रपट ‘आदिपुरुष’मध्ये असलेला ‘जानकी भारत की बेटी है’चा नारा केवळ नेपाळमध्येच नाही तर भारतातही चुकीचा घोषित केला जात नाही.

काठमांडू मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये कोणत्याही हिंदी चित्रपटाला परवानगी दिली जाणार नाही. ती दुरुस्त करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जय माता सीता."

Adipurush: आदिपुरुष रिलीज झाला अन् नेपाळमध्ये राडा पेटला.. सीतेच्या जन्मस्थान वादाबद्दल सिनेमावर बंदी
Eknath Shinde: अहोरात्र मेहनत घेणारे मुख्यमंत्री, कार्तिकी गायकवाडने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

रिपोर्टर राहुल राऊत यांनी नंतर ट्विट केले की, "नेपाळ सेन्सॉर बोर्डाने एका वादग्रस्त संवादानंतर चित्रपट पास केला होता आणि दावा केला होता की

'सीता ही भारताची कन्या आहे' हा संवाद चित्रपटातून काढून टाकण्यात आला आहे." आता खरंच सिनेमात हा संवाद आहे आणि याचा परिणाम पुढे कसा होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

ओम राऊत यांनी 'आदिपुरुष'चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत आहे, तर क्रिती सेनॉन जानकीच्या भूमिकेत आहे.

तर सैफ अली खानने लंकेशची तर सनी सिंगने लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.