Adipurush dialogue: गडी नमला! डायलॉग वादावर लेखकाचा महत्वाचा निर्णय, आता सिनेमात...

Adipurush dialogue
adipurush controversial dialogues will be changed manoj muntashir tweets viral
Adipurush dialogue adipurush controversial dialogues will be changed manoj muntashir tweets viral Esakal
Updated on

आदिपुरुष या चित्रपटावरुन सध्या मोठा गोंधळ सुरु आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांनी या चित्रपटात डझनभर चुका काढल्या. प्रेक्षकांना ना या चित्रपटात डायलॉग आवडले ना कुणाचे पात्र...चित्रपटातलं VFX तर गंडलेले आहेच त्याचबरोबर चित्रपटातील कलाकरांचे लुक्सही खुपच विचित्र करण्यात आल्याचा आरोप प्रेक्षकांनी केला आहे.

मात्र प्रेक्षकांना या चित्रपटात सगळ्यात जास्त खटकलं ते चित्रपटातील डायलॉग.. सोशल मिडियावर तर चक्क या चित्रपटाच्या डायलॉगला छपरी म्हटलं गेलं आहे.


सोशल मीडियाद्वारे या संवादावरुन ‘आदिपुरुष’ला ट्रोल करण्यात येत आहे. 'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की..'' असा संवाद ऐकल्यानंतर तर प्रेक्षक भडकलेच.

मात्र हा एकच नव्हे तर असे अनेक संवादांवर आक्षेप घेण्यात आला आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर कडाडून टिका करण्यात आली आहे. असे छपरी संवाद चित्रपटातुन काढून टाकण्यात यावेत अशी मागणीही चाहत्यांनी केली होती.

दरम्यान आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटातील न आवडलेले आणि टिका होत संवाद काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी एक पोस्ट शेयर केली आहे.

या शेयर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मनोज मुंतशीर यांनी सांगितले की, त्यांनी या चित्रपटात 4000 हून अधिक संवाद लिहिले आहेत. मात्र त्यांनी लिहिलेल्या 5 डायलॉग्सवर लोकांचा आक्षेप आहे. अशा स्थितीत आठवडाभरात हे संवाद बदलले जातील.


मनोजने ट्विट केले की, रामकथेतून पहिला धडा शिकता येतो तो म्हणजे प्रत्येकाच्या भावनेचा आदर करणं. बरोबर की चूक, काळ बदलतो पण भावना तशीच राहते. मी आदिपुरुष मध्ये 4000 हून अधिक ओळींचे संवाद लिहिले, 5 संवादाने लोकांच्या काही भावना दुखावल्या.

त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाचा महिमा होता, माता सीतेच्या पावित्र्याचं वर्णनही होते, त्यांची स्तुतीही व्हायला हवी होती, जी मला का मिळाली नाही हेच कळत नाही. असं देखील त्याने या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

तर या ट्विटच्या शेवटी तो लिहितो की, 'माझ्यासाठी तुझ्या भावनांपेक्षा दुसरं काहीही महत्वाच नाही. मी माझ्या संवादांच्या बाजूने अगणित युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमचं दुःख कमी होणार नाही.

मी आणि चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शक यांनी ठरवलं आहे की, जे काही संवाद तुम्हाला दुखावत आहेत, आम्ही त्यांचा शोध घेवुन आणि याआठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट करू. श्री राम तुम्हा सर्वांचे कल्याण करो'

अर्थात या ट्विटच्या माध्यमातुन त्याने प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत या चित्रपटातील विवादित संवाद बदलण्यात येणार असल्याचं सांगतिलं आहे त्यामुळे आता आदिपूरुषचे चाहते हे काही प्रमाणात खुश झाले असले तरी ते टिकाही करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.