Adipurush Controversy Chilkur Balaji Temple priest review : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाण जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा कुणालाही वाटले नव्हते की हा चित्रपट आठशे कोटींपेक्षा जास्त कमाई करेल. त्या चित्रपटाची कथा, भूमिका, पटकथा आणि संवाद याविषयी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतरही या चित्रपटानं केलेली कमाई कित्येक दिवस अनेकांच्या चर्चांचा विषय होता.
यासगळ्यात आता आदिपुरुष चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली असली तरी त्याचा विषय, त्याची मांडणी, पात्रं, त्यांची भूमिका आणि संवाद यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरुन या चित्रपटावर कडाडून टीका करण्यात आली. त्याचाही परिणाम आदिपुरुषवर झाला. यासगळ्यात चिलकूर मधल्या बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी एस रंगराजन यांनी आदिपुरुषचा रिव्ह्यु केला आहे.
रंगराजन यांचा तो रिव्हयु आता चर्चेत आला आहे. त्यांनी आदिपुरुष अनेकांना समजलाच नाही असे म्हणत मेकर्सचं कौतूकही केलं आहे. हे कित्येकांना माहिती आहे की, याच रंगराजन यांनी आदिपुरुषची टीम जेव्हा तिरुपती बालाजीला आली होती तेव्हा त्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता रंगराजन यांची प्रतिक्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ओम राऊत यांनी आदिपुरुषच्या माध्यमातून जो काही प्रयत्न केला आहे त्याचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे. त्याचे कौतूक व्हायला हवे. हा चित्रपट म्हणजे रामायणाचे पूर्णपणे रुपांतरण नाही. त्याच्या पटकथेमध्ये काही बदल व्हायला हवे होते. ते झाले नाहीत. मात्र तरीही आदिपुरुषच्या मेकर्सनं जो प्रयत्न केला तो भक्तिपूर्ण होता. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
काही दिवसांपूर्वी ओम राऊतनं क्रिती सेननला तिरुपती बालाजी मंदिराच्या बाहेर किस केलं होतं. त्यामुळे मोठा वाद झाला होता. त्यावरुन रंगराज यांनी राऊत आणि क्रिती सेनन यांच्यावर आगपाखड केली होती. ते प्रकरण चर्चेत आले होते. यानंतर आता रंगराजन यांच्या त्या रिव्ह्युविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आदिपुरुष या वर्षीचा सर्वाधिक कमाई कऱणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. यापूर्वी पठाणनं विक्रमी कमाई केली आहे. आदिपुरुषनं सर्वाधिक रेटिंग मिळवत वेगळेपण अधोरेखित केले आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आदिपुरुषची यावर्षी सर्वाधिक चर्चा झाली. त्यावरुन वादही झाला. या चित्रपटानं आतापर्यत सहाशे कोटींची विक्रमी कमाई केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा जोर कमी झालेला दिसून आला आहे. त्याचे कारण त्याच्याविषयी आलेले निगेटिव्ह रिव्ह्यु. अनेकांनी आदिपुरुषला नावं ठेवली आहे. यामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी सडकून टीका केली होती. त्यानंतर आदिपुरुषविषयी सोशल मीडियावर झालेली चर्चाही या चित्रपटाविषयक नकारात्मक प्रचार करणारी होती. यासगळ्यात व्हायरल झालेले वेगवेगळे रिव्ह्यु प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.