ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटावरून सुरु झालेला वाद काही थांबण्याच नाव घेत नाही आहे. प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर आदिपुरुष या चित्रपटावर प्रेक्षकांचा राग आहे. चित्रपटातील काही संवाद आणि व्हीएफएक्सवर लोकांनी खुप संताप व्यक्त केला. त्यानंतर चित्रपटातील संवाद आम्ही बदलू अशी भुमिका निर्मात्यांनी घेतली.
तरी देखील या चित्रपटामुळे होणाऱ्या वादात आणखीणच भर पडत आहे. केवळ चाहते आणि प्रेक्षकांनीच नव्हे तर अनेक मोठ मोठ्या कलाकरांनीही या चित्रपटावर टिका केली. मनोरंजन विश्वासोबत राजकिय क्षेत्रातुनही या चित्रपटावर कडाडून टिका होत आहे.
आता त्यातच आणखी एका दृश्यावरुन वाद पेटला आहे. आदिपुरुषमध्ये बिभिषणच्या पत्नीच्या पात्रातील एका दृश्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर नेटकरी या दृश्यावर टीका करत आहे. त्यातच आता भाजप नेते कपिल मिश्रा यांनी देखील या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. या आक्षेपार्ह दृश्यांवर कपिल मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या दृश्याचा फोटो शेयर करत त्यानी ट्विट केलं आहे. हे शेअर करताना कपिल मिश्रा यांनी लिहिले, "हनुमानजींना थिएटरमध्ये बसून हे दाखवा?"
आदिपुरुषच्या या अश्लील दृश्यावर सोशल मीडिया यूजर्सनी देखील आधीच आक्षेप होता. आता कपिल मिश्राच्या ट्विटवर प्रतिक्रिया देतानांही नेटकरींनी आदिपुरुषला 'कलयुगातील रामायण' असं म्हटलं आहे.
आदिपुरुषमध्ये बिभिषणच्या पत्नीचे कपडे बदलतानाचे हे दृश्य आहे. त्यावेळी बिभिषण तिला रामाचा महिमा सांगत असतात. या सीनचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
रामायणात, सरमा ही बिभिषणची पत्नी आहे. सरमाची भूमिका अभिनेत्री तृप्ती तोरडमलने केली आहे. तृप्ती एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.
आदिपुरुष या चित्रपटातुन तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. तिचे वडील मधुकर तोरडमल हे देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिने दोन मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'आदिपुरुष' 16 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभास भगवान श्रीरामाच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेनन माता जानकीच्या भूमिकेत आहे. याशिवाय सैफ अली खानला रावणाची भूमिका केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.