Adipurush Director Om Raut : 'मला नावं ठेवू नका, मी रामभक्त!' दिग्दर्शक ओमनं प्रेक्षकांच्या आरोपांचे केले खंडन

आदिपुरुषच्या वादावर आता दिग्दर्शक ओम राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Adipurush Director Om Raut
Adipurush Director Om Raut
Updated on

Adipurush Controversy - आदिपुरुषच्या वादावर आता दिग्दर्शक ओम राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यासगळ्यात येत्या काळात नितेश तिवारी दिग्दर्शित रामायणावर आधारित एक चित्रपट येतो आहे त्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

ओमच्या आदिपुरुषवर वेगवेगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. यासगळ्यात दिग्दर्शकानं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्यावर जे आरोप केले जात आहे, त्याचे खंडन केले आहे. याशिवाय त्यानं आगामी काळात येणाऱ्या रामायणावर आधारित चित्रपटांविषयी मोकळेपणानं प्रतिक्रियाही दिली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला रामायणही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

मी रामभक्त आहे....

एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक ओम राऊत यांनी आपण रामभक्त असल्याचे म्हटले आहे. याशिवाय येत्या काळात नितेश तिवारी जे रामायणावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओम राऊत यांनी म्हटले आहे की, नितेश हा एक चांगला दिग्दर्शक आहे. आणि माझा चांगला मित्रही आहे. तो रामायणावर आधारित चित्रपट बनवणार असल्याचे ऐकले. आणि आनंद झाला.

मी त्याचा दंगल नावाचा चित्रपट पाहिला असून तो किती प्रतिभावान दिग्दर्शक आहे हे दिसून आले आहे. त्यामुळे रामायणावर आधारित त्याच्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.

मी एका रामभक्तासारखी त्याच्या या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत आहेत. मला असे वाटते की, रामायणावर जेवढ्या फिल्म्स येतील त्याचे स्वागत प्रेक्षकांनी करायला हवे. त्यातून आपण रामायण अधिक चांगल्या पद्धतीनं समजावून घेऊ शकू. अशी प्रतिक्रिया ओम यांनी दिली आहे.

आदिपुरुष वादात का अडकला?

त्याचं झालं असं की, गेल्या दोन वर्षांपासून आदिपुरुष चित्रपटाची चर्चा होती. कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित व्हायला उशीर झाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांच्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. जेव्हा त्याचा पहिल्यांदा टीझर समोर आला तेव्हा त्यावरुन वाद झाला होता. चित्रपटातील पात्रं, त्यांची वेषभूषा, संवाद यावरुन नेटकऱ्यांनी मेकर्सला धारेवर धरले होते.

Adipurush Director Om Raut
Viral Video : प्रत्येक आई सारखीच असते! रागावलेल्या मांजरीने पिल्लाला मारली कानफडात

१६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची निराशा झाल्याचे दिसून आले. चारशे कोटींपेक्षा जास्त बजेट असणाऱ्या या चित्रपटाचे व्हिएफएक्स कमालीचे नित्कृष्ट दर्जाचे होते अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून आल्या. चित्रपटातील पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद हे प्रभावहीन आणि बालिश असल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. वादाला सुरुवात झाली.

Adipurush Director Om Raut
Ranbir Kapoor: 'आलिया बेडवर खुपच...', बेडरूमचे सिक्रेट सांगताना काय बोलून गेला रणबीर....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.