Adipurush Controversy : 'कुराणावर एखादी डॉक्युमेंट्री करुन दाखवा'! कोर्ट असं का म्हणाले?

आदिपुरुषमध्ये जे संवाद आहेत त्यामुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
Adipurush Controversy
Adipurush Controversy esakal
Updated on

Adipurush demanded Manoj Muntashir to be sent to jail : ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुषचा वाद अजूनही काही संपलेला नाही. तो कोर्टात गेला आहे. अलाहाबाद कोर्टामध्ये या चित्रपटावर याचिका दाखल करण्यात आली असून त्यात हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू देवतांचा अपमान आदिपुरुषमध्ये केला गेल्याचेही त्या याचिकेमध्ये म्हटले आहे.

आदिपुरुषमध्ये जे संवाद आहेत त्यामुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशिर यांना ते संवादलेखन करणे महागात पडले आहे. त्यांना तर आता पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. मुंतशिर यांच्याविरोधात बाजू मांडणाऱ्या वकीलांनी तर कोर्टाकडे मुंतशिर यांना अटक करण्यात यावी. अशी मागणी केली आहे. हिंदूच्या भावना दुखावण्याचे काम या चित्रपटानं केले आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

त्या वकीलांनी म्हटले आहे की, हिंदू धर्माचा अवमान आदिपुरुष या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. केवळ मुंतशिरच नाहीतर त्या चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकारांनाही देखील अटक व्हायला हवी. आणि यापुढील काळात अशा प्रकारचे चित्रपट तयार होऊ नयेत. अशी मागणीही करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु असून कोर्टानं देखील मेकर्सला चांगलेच झापले आहे. त्यांनी अनेक प्रश्नही निर्मात्यांना विचारले आहेत.

Adipurush Controversy
Lust Stories 2 Review : एकट्यानचं पाहिलेला बरा, कुटूंबासमवेत चुकूनही पाहू नका...

तिसऱ्या दिवशी कोर्टानं म्हटले आहे की, हिंदू लोकांचा संयम पाहिला जातो आहे का अशी परिस्थिती आहे. असं चित्र दुसऱ्या धर्माच्या बाबत दिसून येणार नाही. कुराणवर जर तुम्ही एखादा छोटासा माहितीपट तयार करण्याचे धाडस दाखवले तर काय होईल हे माहिती आहे का, असा प्रश्नही कोर्टानं केला आहे. कुणाच्या भावना दुखावता कामा नये, याची काळजी निर्मात्यांनी घ्यायला हवी.

Adipurush Controversy
Viral Video : झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय गुपचूप खातोय, चांगलाच भुकेला दिसतोय!

अलाहाबादमधील लखनऊ बेंचनं तीन दिवस आदिपुरुष खटल्यावर सुनावणी केली आहे. पहिल्या दिवसापासून कोर्टानं वेगवेगळ्या गोष्टींवरुन आदिपुरुषच्या टीमला धारेवर धरले आहे. चित्रपटामध्ये भगवान राम, हनुमान आणि सीता यांना ज्याप्रकारे दाखवण्यात आले आहे त्यावरुन मेकर्सला समाजात काय मेसेज द्यायचा आहे. हे त्यांनी सांगावे. हे सगळं करुनही मेकर्स म्हणतात की हे रामायण नाही...ते प्रेक्षकांना वेड्यात तर काढत नाही ना असा प्रश्नही कोर्टानं केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()