Prabhas Casting In Adipurush: आदिपुरुषमध्ये रामाच्या भुमिकेत प्रभासच का? दिग्दर्शकानं अखेर सांगितलं कारण..

Prabhas Casting In Adipurush
Prabhas Casting In AdipurushEsakal
Updated on

Adipurush Film Release: सध्या मनोरंजन विश्वात फक्त एकाच चित्रपटाची चर्चा आहे तो म्हणजे 'आदिपुरुष'. या चित्रपटाला थिएटरमध्ये रिलिज होऊन तीन दिवस पुर्ण झाले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटावरुन भयंकर वाद झाला.

या चित्रपटामुळे चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. सोशल मिडियावर तर ज्यानेही हा चित्रपट पाहिला त्याने हा चित्रपट का पाहू नये याचे व्हिडिओ शेयर केले आहेत.

Prabhas Casting In Adipurush
Adipurush Nepal: काठमांडू मध्ये आदिपुरुष वर बंदी, यापुढे कोणताही बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणार नाही

वाद एकीकडे मात्र दुसरीकडे प्रभासच्या चाहत्यांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतल आहे. प्रभासची क्रेझ ही केवळ साउथमध्येच नाही तर जगभर पसरली आहे यात काही शंकाच नाही. बाहूबलीनंतर तर प्रभासची लोकप्रियता अधिकच वाढली.

प्रभासच्या चाहत्यांना या चित्रपटातील त्याची भुमिका भारच आवडली तर काहींना प्रभासवर कडाडून टिका देखील केली.

त्याने चित्रपटात अॅक्टिंगच्या नावावर फक्त काहीच केल नाही. रामाची भुमिका साकारत असतांना त्याच्या चेहरा मात्र खुपच निस्तेज असल्याच प्रेक्षकांच म्हणणं आहे. तर समिक्षकांनी देखील प्रभासच्या अभिनयावर टिका केली आहे.

Prabhas Casting In Adipurush
Adipurush BO Day 3: पब्लिक वादात व्यस्त 'आदिपुरुष'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन मात्र मस्त!

याचित्रपटासाठी प्रभासने तब्बल150 कोटी रुपये घेतल्याच सांगण्यात येते

 आदिपुरुषची तुलना रामानंद सागर यांच्या रामायणाशी करणारे हिंदी प्रेक्षकांचे अनेक चाहते आहेत. अशा परिस्थितीत रामानंद सागर यांच्या रामायणाच्या तुलनेत आदिपुरुषाचा राम तितकासा स्थिर नाही, असे अनेक चाहत्यांना वाटते.

असे अनेक लोक आहेत जे प्रभासचे कौतुक करत आहेत पण ते त्याला चित्रपटात रामच्या भूमिकेत घेण्याच्या बाजूने नाहीत. अशा परिस्थितीत आता ओम राऊत यांनी स्वतः आदिपुरुषच्या चित्रपटासाठी प्रभासलाच का घेतल यामागचं कारण सांगितलं आहे.

Prabhas Casting In Adipurush
Pujappura Ravi Death: दिग्गज मल्याळम अभिनेते पुजापूरा रवी यांचं निधन, ८०० पेक्षा जास्त सिनेमात केलंय काम

प्रभासला का कास्ट केलं असा प्रश्न अनेकांच्या डोक्यात होता त्यावर उत्तर देतांना ओम राऊत म्हणाला की, या चित्रपटासाठी प्रभास हा माझा एकमेव पर्याय होता. या भूमिकेसाठी मी त्याच्याशिवाय कोणाचाही विचार केला नाही.'

Prabhas Casting In Adipurush
Adipurush Controversy : 'आदिपुरुष भंगार, पठाण भंगार पण याच सगळ्यात...'

पुढे ओम म्हणतो की, आदिपुरुष पाहिला तर लक्षात येईल की हा चित्रपट तरुणांसाठी बनवला आहे. रामायण चित्रपटाच्या रूपात दाखवणं इतकं सोपं नाही, विश्वास आणि समजूतीनुसार याला दाखवता येते. मी चित्रपटात फक्त पराक्रमी राम, युद्धकांड आणि परमवीर राम यांची गोष्ट दाखवली आहे. रामचा हा गुण मला अधिक प्रभावित करतो, म्हणून त्याचा मी या चित्रपटात समावेश केला.

या चित्रपटाच्या कमाई बाबत बोलायचं झालं तर नेपाळमध्ये या चित्रपटाला प्रचंड विरोध होत असून या चित्रपटामुळे नेपाळमध्ये सर्व हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. वाद अन् विरोध होत असतांनाही . चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 67 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.