Adipurush Trailer Director Om Raut News: आज आदिपुरुषचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आदिपुरुषच्या ट्रेलरने अल्पावधीतच सोशल मीडियावर धुरळा उडवला आहे.आदिपुरुषच्या ट्रेलरने सर्वांची पसंती मिळवली आहे. या सिनेमाचा दिग्दर्शक आहे ओम राऊत.
खूप कमी जणांना ठाऊक नसेल की ओम राऊतने लोकमान्य या मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. पुढे ओम राऊतने ऐतिहासिक बॉलिवूडपट तान्हाजी निमित्ताने सर्वांच्या मनात घर केलं.
आता आदिपुरुष निमित्ताने ओम राऊतने थेट रामायणाचा मोठा विषय निवडला आहे. ओम राऊतच्या कुटुंबाची पार्श्वभूमी फार मोठी आहे. जाणून घेऊ.
(Adipurush director om raut father is a former MP from Maharashtra, who was given the ticket by Shiv Sena)
आधी इंजिनियर मग दिग्दर्शक
ओम राऊत मूळचा इंजिनिअर. ओम राऊतची आई नीना राऊत या प्रसिद्ध निर्मात्या. ओम राऊतला फिल्ममेकिंग आणि सिनेमाविषयक दूरदृष्टी घरातूनच मिळाली.
ओम राऊतने न्यूयॉर्क येथील सिराक्यूज विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्समधून फिल्म्स विषयात डिग्री मिळवली.
फिल्ममेकिंगचं रीतसर शिक्षण घेऊन ओमने भारतात येऊन पहिला सिनेमा बनवला तो म्हणजे लोकमान्य. ओम राऊतचे वडील भारतकुमार राऊत सुद्धा मोठे व्यक्ती आहेत. कोण होते भारतकुमार राऊत जाणून घ्या..
शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत
भारतकुमार राऊत हे सुप्रसिद्ध आणि विख्यात पत्रकार. त्यांनीमहाराष्ट्र टाइम्सचे संपादक पद भूषवले आहे. विशेष गोष्ट म्हणजे भारतकुमार राऊत शिवसेनेचे खासदार होते. भारतकुमार राऊत यांना शिवसेना पक्षातर्फे तिकीट मिळालं होतं. आणि त्यांनी खासदारकी केली होती.
त्यांनी चार दशकांहून अधिक काळ राज्यसभेचे खासदार म्हणून पद भूषवले आहे. त्यांनी महाराष्ट्र टाइम्स, द इंडियन एक्सप्रेस, द पायोनियर, मुंबई दूरदर्शन अशा अनेक मीडिया हाऊसमध्ये महत्वाच्या जबाबदारी भूषवल्या आहेत.
एकूणच वडिलांकडून मिळणारा ज्ञानाचा वसा आणि आईकडून मिळणारी सिनेमाविषयक दूरदृष्टी अशा गोष्टींचा पुरेपर उपयोग करत ओम राऊत दिग्दर्शक म्हणून यशस्वी वाटचाल करतोय. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमा १६ जूनला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.