Adipurush: प्रभास,सैफ अली खान,कृती सनन अभिनित आदिपुरुष सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला अन् लगोलग वादातही सापडला. सिनेमातील रावणाला आणि हनुमाला तर लोकांनी खूप काही सुनावलं कारण ठरतायत त्यांचे लूक्स. अर्थात यामुळे सिनेमात रावण साकारलेल्या सैफला तर बरंच ट्रोल केलं गेलं. आता या सगळ्या वादा दरम्यान सिनेमाची तुलना अक्षय कुमारच्या रामसेतू सोबत केली जात आहे. यावर आता आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊतनं आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. (Adipurush Director on Akshay Kumar's Ramsetu Movie.)
रामसेतुशी आदिपुरुषची तुलना झाली त्यावर ओम राऊत म्हणाला,''रामायणसारखा मोठा इतिहास आपल्याला लाभला आहे. मी स्वतः प्रभू रामचंद्रांचा भक्त आहे आणि याचा मला अभिमान आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की 'रामसेतू' मध्ये जसं दाखवल आहे की,रामायण ही फक्त एक गोष्ट नाही, ते मला खूप भावलं. हा सिनेमा आजच्या पिढीला दाखवून देतो की रामायण आपला इतिहास आहे, केवळ धार्मिक कथा नाही. मी अक्षय कुमार यांना याविषयीचं माझं हे मत बोलून दाखवलं आहे. रामसेतू सगळ्यांना दाखवून देईल की आपल्या जवळ रामाची जन्मभूमी,पंचवटी,रामसेतू सारखा ऐतिहासिक खजिना आहे आणि आपण जगात किती श्रीमंत आहोत''.
राम सेतु यावर्षी दिवाळीत रिलीज होत आहे आणि सिनेमात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा दिसणार आहेत. दोन्ही सिनेमे रामायणाशी जोडलेले आहेत. आणि म्हणूनच आदिपुरुष सिनेमाची तुलना रामसेतुशी केली जात आहे.
आता सोशल मीडियावर तर याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. लोक दोन्ही सिनेमांविषयी आपल्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. एकीकडे 'रामसेतु' जेव्हा रिलीज होतोय तेव्हा त्याची टक्कर बॉक्सऑफिसवर अजय देवगणच्या 'थॅंक गॉड'शी होणार आहे. तर दुसरीकडे आदिपुरुषवरनं वाद सुरुच आहेत.
काही दिवसांपूर्वी पत्रकारांना आदिपुरुष सिनेमाचा थ्रीडी टीझर दाखवला गेला, ज्याला खूप पसंती देखील मिळाली. यादरम्यान ओम राऊतला प्रश्न विचारला गेला होता की सिनेमाचं नाव आदिपुरुष का? रामायण किंवा मग मर्यादा पुरुषोत्तम असं का नाही ठेवलं. त्यावर दिग्दर्शक ओम म्हणाला,''जर तुम्ही नीट विचार केलात तर आपलं रामायण असं नाही ज्याला तुम्ही फक्त ३ तासात मांडाल. रामायणात प्रभु रामचंद्रांसोबत सीता आणि इतर निगडीत गोष्टींना देखील समोर आणलं आहे. आणि हे सगळं फक्त ३ तासात मांडणं निव्वळ अशक्य. त्यामुळे आम्ही सिनेमात केवळ एका भागावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे आणि तो आहे सीतेचं हरण ते रावणाचा वध''.
ओम राऊत पुढे म्हणाला,''रामायणाला मी १० वर्षापूर्वी ज्या दृष्टिकोनातून पहायचो त्याला मी आता वेगळ्या विचारातून पाहतोय आणि कदाचित आणखी काही वर्षांनी माझा आजचा दृष्टिकोनही बदललेला असेल. आणि कदाचित सगळ्यांच्या बाबतीत असं घडू शकतं. मी रामाचं जे रुप सिनेमात दाखवलंय तो राम पराक्रमी आहे, सर्वोत्नम गुण त्याच्यात आहेत. माझ्या सिनेमाच्या नावाच्या बाबतीत म्हणाल तर इथे 'आदि'चा अर्थ सुरुवात असा नाही तर 'सर्वोनुअंगे उत्तम' हा होतो''.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.