'आदिपुरुष'मध्ये प्रभास साकारणार श्रीराम तर क्रिती सीतेच्या भूमिकेत 

adipurush team
adipurush team
Updated on

'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासच्या 'आदिपुरुष' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या टीममध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या चित्रपटात आता अभिनेत्री क्रिती सनॉनची एंट्री झाली आहे. क्रितीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली. या चित्रपटात प्रभास श्रीरामाची तर सैफ अली खान खलनायकी भूमिका साकारणार आहे. रामायणाची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. क्रितीने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये प्रभास आणि तिच्यासोबत अभिनेता सनी सिंगसुद्धा आहे. प्रभासने नारंगी रंगाचा आणि सनीने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर क्रिती गुलाबी रंगाच्या सूटमध्ये पाहायला मिळतेय. 'एका नवीन प्रवासाला सुरुवात होतेय. माझ्या खूप खास व्यक्तींपैकी हे आहेत. आदिपुरुषचा भाग झाल्याबद्दल खूप आनंद आहे', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. 

चित्रपटात प्रभास श्रीरामाची, क्रिती सीतेची आणि सनी लक्ष्मणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. तर सैफ रावणाच्या भूमिकेत असल्याचं कळतंय. या चित्रपटाच्या टीमवर चाहत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kriti (@kritisanon)

दीपिकाची एग्झिट
प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटात आधी दीपिका पदुकोण झळकणार होती. सीतेच्या भूमिकेसाठी दीपिकाला निवडण्यात आलं होतं. मात्र दीपिका आणि प्रभासने आधीच नाग अश्विनच्या चित्रपटाला स्वीकारलं होतं. त्यामुळे दोन्ही चित्रपटांसाठी शूटिंग करणं जमत नसल्याने दीपिकाने माघार घेतल्याचं कळतंय. मात्र यामुळे क्रितीला मोठी भूमिका मिळाली. प्रभास आणि सैफसोबत क्रितीचा हा पहिलाच चित्रपट आहे 

सनी सिंगची एंट्री
सनीने २०११ मध्ये 'दिल तो बच्चा है जी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्यार का पंचनामा २'मुळे तो प्रकाशझोतात आला. त्यानंतर २०१८ मध्ये 'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. सनीने मालिकांमधून त्याच्या करिअरला सुरुवात केली. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.