Adipurush Jai Shri Ram Song News: सध्या सगळीकडे ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाची चर्चा आहे. आदिपुरुषचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आदिपुरुषचा ट्रेलरला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.
आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये प्रभास, क्रिती सेनन अनुक्रमे श्रीराम आणि सीतेच्या भूमिकेत झळकत आहेत.
आता आदिपुरुषचा सिनेमातलं पहिलं गाणं लाँच झालंय. या गाण्यातून श्रीरामभक्तीचा जागर दिसतोय.
(adipurush movie first song jai shri ram out now music by ajay atul)
आदिपुरुष सिनेमातलं पहिलं गाणं जय श्री राम आज भेटीला आलंय. आदिपुरुष सिनेमाच्या टिझर आणि ट्रेलरपासून बॅकग्राउंडला वाजणाऱ्या जय श्री राम गाण्याची उत्सुकता होती. अखेर आज भव्य दिव्य पद्धतीने सिनेमाचे संगीतकार आणि गाण्याचे गायक अजय अतुल यांच्या उपस्थितीत हे गाणं लाँच झालंय. जय श्री राम हे गाणं ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. अजय - अतुलच्या संगीताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
काहीच दिवसांपुर्वी आदिपुरुषच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात क्रिती सेननने प्रभासबद्दल कौतुकाचे शब्द काढले. प्रभास हा आदिपुरुष सिनेमात भगवान श्रीरामांची भूमिका साकारत आहे.
प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला.
ट्रेलर लाँचच्या वेळी, क्रिती सेनन म्हणाली की तिचा सहकलाकार प्रभास हा भगवान रामसारखा आहे - एक "साधा" माणूस जो "मनापासून" सरळ बोलतो.
याशिवाय याच ट्रेलर लॉंच सोहळ्यात प्रभास म्हणाला "मला सध्या खूप त्रास होत आहे. 'आदिपुरुष' हा आपल्या सर्वांसाठी एक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल मी कृतज्ञ आहे. खूप कमी कलाकार आहेत ज्यांना भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे मला खूप धन्य वाटते. मला या पात्राबद्दल आदर आणि कौतुक वाटले पण मी या चित्रपटासाठी शटिंग केल्यामुळे याबद्दल आदर खुप वाढला. माझ्यासाठी, जानकीने एक शुद्ध, दयाळूपणाचे संयोजन प्रतिनिधित्व केले. खंबीर मनाचा आत्मा.
मी माझे 200 टक्के या भूमिकेसाठी दिले आहेत. ते देव होते, आम्ही फक्त माणसे आहोत. त्यामुळे जर काही कमतरता असेल तर मला माफ करा," असे अभिनेता म्हणाला.
या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन देवी सीता, सनी सिंग लक्ष्मण आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.