Adipurush Movie Trailer Om Raut Sanatan Dharma CBFC : ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेनं वाट पाहत आहेत त्या आदिपुरुषचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तो प्रचंड लोकप्रियही झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याची चर्चा आहे. काही नेटकऱ्यांना मात्र त्या ट्रेलरमधील गोष्टी खटकल्या आहेत. हनुमान राम यांना पाठीवर बसवून लंकेला घेऊन गेले होते का, सीतेची वेशभूषा यासारख्या अनेक गोष्टींवरुन चर्चेला सुरुवात झाली आहे.
आदिपुरुषचा जेव्हा टीझर आला होता तेव्हा त्यातील व्यक्तिरेखेवरून मोठा वाद झाला होता. रावणाची भूमिका सैफ अली खाननं केलीच कशी, यापासून ही सुरुवात झाली होती. त्यावर दिग्दर्शक ओम राऊत यांना धारेवर धरण्यात आले होते. काहीही झाले तरी हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही अशी भूमिका त्यावेळी देशातील काही संघटनांनी घेतली होती. आताही ट्रेलर प्रदर्शित होताच सनातन धर्म संघटनेनं आदिपुरुषविषयी आगपाखड केली आहे.
Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
आदिपुरुषच्या पोस्टरमध्ये गंभीर चूका आहेत. तसेच चित्रपटातील व्हिज्युएल्समधून भावना दुखावण्यात आल्याचा आरोप त्या संघटनांकडून करण्यात आला आहे. प्रभास आणि क्रिती सेनन, सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरुष हा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. ओम राऊत यांनी देखील आपल्याला या चित्रपटाविषयी खूप अपेक्षा असल्याचे म्हटले होते.
सनातन धर्माचे प्रचारक संजय तिवारी यांनी सीबीएफसी बोर्डाला पत्र लिहिले असून आदिपुरुष प्रदर्शित होण्यापूर्वी आमच्यासाठी त्याचे स्क्रिनिंग आयोजित केले जाणे महत्वाचे आहे. अशी भूमिका केली आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयामध्ये आदिपुरुष्या विरोधात याचिकाही दाखल केली आहे.
याचिकाकर्त्यांनी या चित्रपटातील जे व्हिज्युअल्स आहेत त्यामध्ये गंभीर चूका आहेत. त्याच चुकांनी जर तो प्रदर्शित झाला तर भावना दुखावण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तो चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावा. अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
आदिपुरुषला जर कोणत्याही त्रासाला सामोरे जायचे नसेल तर त्यांनी १६ जून पूर्वी आमच्यासाठी खास स्क्रिनिंगचे आयोजन करावे. नाहीतर त्यावरुन वाद, संघर्ष होण्याची शक्यता अधिक आहे. असे त्या याचिकेमध्ये म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.