Adipurush Movie : बॉलीवूड सेलिब्रेटी 'आदिपुरुष' चित्रपटाचे दहा हजार तिकीट का करताहेत बूक?

आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरनं देखील गरीब मुलांसाठी दहा हजार तिकीटं बूक केल्याची बातमी समोर आली आहे.
Adipurush Movie
Adipurush Movieesakal
Updated on

Adipurush Movies Ranbir Kapoor Thousand Tickets Book : आदिपुरुष हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. राऊत यांच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा दिसून येत आहे. मात्र यासगळ्यात एक गोष्ट नेटकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित करत आहे.

यापूर्वी काश्मिर फाईल्सच्या मेकर्सनं आदिपुरुष चित्रपटाची दहा हजार तिकीटं बूक केली होती. त्यानंतर आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरनं देखील गरीब मुलांसाठी दहा हजार तिकीटं बूक केल्याची बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी रणबीर आणि त्याची पत्नी आलिया हे देखील रामायणावर आधारित एका चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Also Read - Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे

त्या चित्रपटामध्ये रणबीर हा भगवान श्रीराम आणि आलिया ही माता सीतेची भूमिका साकारणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रणबीरनं गरीब मुलांसाठी दहा हजार तिकीटं बूक करण्याची ही पहिलीच घटना असून त्याच्या या उपक्रमामुळे त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. आदिपुरुषच्या टीमनं याविषयी ही माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.

Adipurush Movie
Ranbir Kapoor: घाम फूटलेला..हात थरथरत होते.., 'या' अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना चक्क घाबरला होता रणबीर..

याचबरोबर चित्रपटाचे निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यात त्यांनी तेलंगाणामधील सरकारी शाळा, अनाथालयं आणि वृद्धाश्रमामध्ये देखील दहा हजार तिकीटांचे वाटप करणार असल्याची माहिती दिली आहे. आदिपुरुषमध्ये प्रसिद्ध अभिनेता प्रभास हा श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत असून क्रिती सेनननं सीतेची भूमिका केली आहे. तर सनी सिंहनं लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खाननं रावणाची भूमिका साकारली आहे.

Adipurush Movie
The Kashmir Files चे निर्माते Adipurush ची १० हजार तिकीटे करणार दान, प्रभासने मानले आभार

यासगळ्यात सोशल मीडियावर मात्र वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. ती म्हणजे आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एवढ्या मोठ्या प्रमाणवर चित्रपटाची तिकीटं का बूक केली जात आहेत, यापूर्वी असा प्रयत्न काही चित्रपटांच्याबाबत झाला त्यात द कश्मिर फाईल्स, केरळ स्टोरी या चित्रपटांची नावं त्यात उदाहरणं म्हणून सांगता येतील. नेटकऱ्यांनी मात्र याचे काही वेगळेच अंदाज बांधले आहेत.

Adipurush Movie
Adipurush Trailer Final: प्रत्येक भारतीयाची कहाणी... गंडलेले VFX तरीही भावला आदिपुरुषचा अंतिम ट्रेलर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.