Adipurush Relased Date : 'राम कार्य करण्यासाठी सदैव तयार'! दिग्दर्शक ओम राऊतची खास पोस्ट!

भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आदिपुरुषचा टीझर ज्यावेळी आला होता तेव्हापासून या चित्रपटाची मोठी चर्चा आहे.
Adipurush Relased Date
Adipurush Relased Date esakal
Updated on

Adipurush Relased Date : भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित आदिपुरुषचा टीझर ज्यावेळी आला होता तेव्हापासून या चित्रपटाची मोठी चर्चा आहे.त्यामध्ये ज्या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या आडनावाविषयी वेगवेगळ्या प्रकारे बोललं जातंय. यासगळ्यात आदिपुरुषच्या प्रदर्शनाची डेट समोर आली आहे.

आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी शेयर केलेली पोस्ट आता चर्चेत आली आहे. त्यामध्ये प्रभु श्रीरामाच्या भूमिकेतील प्रभासचा फोटो आणि रिलिज डेट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. खरं तर ओम राऊतच्या या चित्रपटाची नेटकरी गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहत आहेत. त्यामध्ये टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता प्रभास, सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Adipurush Relased Date
Ved Movie Box Office Collection: 'वेड'नं खरंच वेडं केलंय! एका आठवड्यात २० कोटींची कमाई..

सैफ अली खाननं रावणची भूमिका का केली हा देखील या चित्रपटातील वादाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे ओम राऊतवर टीकेचा वर्षाव झाला होता. याशिवाय टीझर पाहून रामायणातील ऐतिहासिक पात्रांशी अन्याय केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला होता. त्यामुळे अनेकांनी आपला संतापही व्यक्त केला होता. त्यानंतर राऊतनं माफी मागून आपण कोणत्याही प्रकारे भावना दुखावणार नाही. असे म्हटले होते.

Adipurush Relased Date
Avatar The Way Of Water 2: जगातल्या महागड्या 'अवतार'च्या आयडियाची कल्पना हिंदू धर्मातली?

आदिपुरुषचा टीझर व्हायरल झाल्यानंतर किमान तीन आठवडे तरी तो विषय चर्चेत होता. आता ओम राऊतनं १५० दिवसानंतर आदिपुरुष आपल्या भेटीला येतो आहे असे सांगून प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. हा चित्रपट १६ जुन रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()