गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वात प्रभास स्टारर आदिपुरुष या चित्रपटाची चर्चा होती. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खुप अपेक्षा होत्या.
ओम राऊतचा 'आदिपुरुष' अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आत्तापर्यंत लोकांनी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला असून सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिक्रियांचाही व्हायरल होत आहेत
प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपटाचा टीझर ऑक्टोबर 2022 मध्ये रिलीज झाला होता. येताच बराच गदारोळ झाला. रावणाच्या लूकपासून ते व्हीएफएक्सपर्यंत लोकांनी मेकर्सवर बरीच टीका केली होती मात्र चित्रपटाला मिळालेल्या प्रतिक्रिया आतापर्यंत संमिश्र आहेत. अनेकांनी चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सवर टीका केली तर इतरांनी चित्रपटाची प्रशंसा केली.
त्यातच आता हैदराबादमध्ये अशी काही घडली आहे की त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल वाद होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ज्या व्हिडिओमध्ये प्रसाद आयमॅक्सच्या बाहेर जमलेल्या पत्रकारांशी एक प्रेक्षक संवाद साधत होता. त्याला हा चित्रपट कसा वाटला असा प्रश्न जेव्हा त्याला विचारण्यात आला जेव्हा त्याने प्रतिक्रिया दिली तेव्हा आजूबाजूच्या जमावाने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तो म्हणाला की, 'त्यांनी प्ले स्टेशन गेममधील सर्व राक्षसांना उचलून या चित्रपटात टाकलं आहे. हनुमान, बॅकग्राउंड स्कोअर आणि काही थ्रीडी शॉट्स सोडले तर चित्रपटात पाहण्यासारख दुसरं काहीही नाही.
त्याचबरोबर त्याला जेव्हा प्रभासबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी तो म्हणाला की, प्रभासला राघवची भुमिका आजिबात शोभलेली नाही. तो बाहूबली मधल्या राजासारखाच दिसत आहे. ओम राऊत यांना प्रभासला नीट दाखवता आलं नाही.
त्यानं त्याच मत मांडताच आजूबाजूच्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला आणि मारहाण करण्यास सुरवात केली. आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि कुणालाही त्या व्यक्तीस मारहाण करण्याचा अधिकार नसल्याच नेटकरी बोलत आहे.
चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या VFX वर प्रेक्षक नाराज आहेत.
तर काहींना चित्रपट आवडला आहे. आता हा चित्रपट 2D आणि 3D मध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर चित्रपट पहिल्याच दिवशी 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय करेल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.