Adipurush: इसके पेट पार बाण मारीये प्रभू, सैफच्या रावण लूकची प्रेक्षकांनी उडवली खिल्ली

आता मात्र सैफ अली खानला मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.
ADIPURUSH Saif ali khan Ravana look mocked by audience
ADIPURUSH Saif ali khan Ravana look mocked by audienceSAKAL
Updated on

Adipurush Saif Ali Khan Look News: आदिपुरुष सिनेमा रिलीज झालाय आणि प्रेक्षकांनी सिनेमाला भरघोस प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. आदिपुरुष सिनेमा थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झालाय.

आदिपुरुष सिनेमात सैफ अली खान लंकेश रावणाची भूमिका साकारत आहेत. सुरुवातीला ट्रेलर आणि टीझरमध्ये आदिपुरुषमधील रावणाच्या लूकचं सर्वांनी कौतुक केलं. पण आता मात्र सैफ अली खानला मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

(ADIPURUSH Saif ali khan Ravana look mocked by audience)

ADIPURUSH Saif ali khan Ravana look mocked by audience
Adipurush Movie: आदिपुरुषमध्ये दिसली मराठमोळी शूर्पणखा.. पाहून तुम्हीही म्हणाल, कमाल

आदिपुरुषचा टीझर रिलीज झाल्यापासून रावणाच्या लूकची खिल्ली उडवली जात आहे. सैफच्या लूकपासून त्याच्या पुष्पक विमानापर्यंत सर्वच गोष्टी ट्रोल झाल्या. रावणाच्या भूमिकेतील सैफचा लूक अलाउद्दीन खिलजीसारखा वाटू लागलाय.

आता रावणाच्या दहा डोक्याच्या लुकची खिल्ली उडवली जात आहे. सैफचा सिनेमातील रावणाच्या लूकमधील दहा डोक्यांचे फोटो समोर आले आहेत.

ADIPURUSH Saif ali khan Ravana look mocked by audience
Adipurush: आदिपुरुष रिलीज झाला अन् नेपाळमध्ये राडा पेटला.. सीतेच्या जन्मस्थान वादाबद्दल सिनेमावर बंदी

सैफचा लूक आवडला नाही

आदिपुरुषमध्ये सैफ अली खानचा रावणाचा लूक लोकांना आवडला नाही. त्याच्या हेअरस्टाईलपासून लांब दाढी आणि डोळ्यात मस्करापर्यंत अनेक गोष्टींची प्रेक्षक खिल्ली उडवत आहेत.

सैफच्या लूकची तुलना मुघलांशी करण्यात आली आहे. एका यूजरने ट्विटरवर लिहिले आहे की, रावणाचा लूक निराशाजनक आहे. तसेच फोटो शेअर करताना लिहिले. ज्याने त्यांना घडवले त्याच्या पोटात देवाने बाण मारावा, असे मिम शेअर करण्यात आले आहेत.

दरम्यान आदिपुरुष रिलीज झाल्यावर नेपाळमध्ये वाद निर्माण झालाय. काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी गुरुवारी चित्रपटातील संवादाच्या एका ओळीवर आक्षेप घेतला, ज्यात सीतेला 'भारताची मुलगी' म्हणून दाखवले आहे.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की 'सीता नेपाळची कन्या असावी' आणि ते म्हणाले की निर्मात्यांना चित्रपट शेड्यूलनुसार प्रदर्शित करायचा असेल तर ही ओळ बदलण्यासाठी तीन दिवस आहेत.

या आक्षेपानंतर महापौर शहा यांनीही हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता महापौर शहा यांच्या या मागणीचा 'आदिपुरुष'च्या प्रदर्शनावर कसा परिणाम होईल हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.